पनवेलहून श्री अमरनाथ सेवा मंडळाचा पहिला जत्ता पोहोचला श्रीनगरला
पनवेल दि.०१ : पनवेलहून श्री अमरनाथ सेवा मंडळाचा पहिला जत्ता बम बम बोलेच्या गजरामध्ये श्रीनगरला पोहोचला असून यापुढे अमरनाथ यात्रेसाठी ते मार्गस्थ करणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष सुनील अचोळकर यांनी दिली आहे.
कोरोना महामारीत बंद असलेली अमरनाथ यात्रा यंदा होणार म्हणजे उत्साहास उधाण. पनवेल हुन श्री अमरनाथ सेवा मंडळ दरवर्षी अमरनाथ यात्रेला जात असतात. यंदाचे त्यांचे २७ वे वर्ष असून आजही ते वाजत गाजत पनवेल येथून श्री अमरनाथ दर्शनासाठी निघाले. विमानाने भाविकांनी श्रीनगर गाठले त्यांच्या सोबत विमानात राजाराणी ट्रेव्हल्सचे मालक अभिजीत पाटील होते. राजाराणी ट्रेव्हल्स म्हणजे भारतातील एकमेव टुरिस्ट कंपनी जी संपुर्ण काश्मीरमध्ये आतंकवाद सर्वोच्च पातळींवर असतांनाही पर्यटकांना मोठ्या हिमतीने सुरक्षित पर्यटनास नेण्याचे काम करत असते. सर्व यात्रेकरू बालटल मार्गे प्रवास करत असताना स्थानिक पोलिसांनी त्यांना अडवून पुढील प्रवासासाठी मज्जाव केला. त्यामुळे या यात्रेकरूंना नाईलाजे पुन्हा श्रीनगर येथे यावे लागले. परंतु अमरनाथ यात्रेसाठी लवकरच मार्गस्थ करणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष सुनील अचोळकर यांनी दिली आहे.
फोटो : श्री अमरनाथ सेवा मंडळाचा पहिला जत्ता श्रीनगरला पोहोचला