शालेय साहित्याचं वाटप व वृक्षारोपण करून केला वाढदिवस साजरा
प्रत्येकाची वाढदिवस साजरा करण्याची संकल्पना वेगवेगळे असते . आष्टी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेडाळा येथील मुख्याध्यापक बापूसाहेब फसले यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केलं व परिसरामध्ये वृक्षारोपण करून आपला वाढदिवस मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा केला .
आपल्या वाढदिवसाच्या दिवशी कुठलाही बडेजाव न करता समाजातील बरेचसे लोक काही आगळेवेगळे उपक्रम राबवत असतात यामध्ये कुणी अन्नदान करतो तर कुणी गोरगरिबांना फळांचे वाटप करतात कुणी वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करून बक्षीस वितरण करतात तर कोणी वंचित दुर्बल घटकांना मदतीचा हात देऊन सामाजिक बांधिलकी जोपासतात .आपल्या वाढदिवसाच्या दिवशी सामाजिक उपक्रम राबवितात गरजुंना मदतीचा हात मिळावा हा उद्देश यामागे असतो .हाच उद्देश मनाशी धरून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेडाळा येथील मुख्याध्यापक व स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे संचालक बापूसाहेब फसले यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना पेन व्ही अंकलिपी अशा प्रकारच्या शैक्षणिक साहित्य वाटप केले .निसर्गाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावणं फार महत्त्व गरजेचा आहे कारण पर्यावरणाचा समतोल बिघडला तर खूप कठीण परिस्थिती भविष्यात निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे प्रत्येकाने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी निदान एक तरी झाड लावून त्यांचे संगोपन केलं पाहिजे .फसले सरांनी वाढदिवसाच्या दिवशी वृक्षारोपणही केलं व संगोपन करण्याची जबाबदारी घेतली .अशाप्रकारे शालेय साहित्य व वृक्षारोपण करून मुख्याध्यापक बापूसाहेब असल्याने आपला वाढदिवस साजरा केला .त्यांचे विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात आले .