नगरसेवक विकास घरत कामोठे वासियांच्या मदतीला धावले
पनवेल दि.०५ गेल्या काही तासापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कामोठे वसाहतीमध्ये अनेक सखल भागात पाणी तुंबले होते. यावेळी स्थानिक नगरसेवक विकास घरत हे तत्परतेने रहिवाश्यांच्या मदतीला धावले.
अनेक ठिकाणी सिडकोच्या गलथान कारभारामुळे गटारे तुंबली होती. वाढत्या पावसाच्या जोरामुळे काही घरात सुद्धा पाणी शिरले होते. यावेळी विकास घरत व व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नाना मुकादम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी धाव घेऊन अनेकांना मदत केली. तसेच सिडको व महानगर पालिका अधिकारी वर्गाला तशी माहीती व आवश्यकता सूचना केल्या. यावेळी विकास घरत यांनी भयभीत नागरिकांना दिलासा देत सर्वोतोपरी मदतीचे आश्वासन दिले.