महानगरपालीका प्रशासनाने युद्ध पातळीवर त्वरीत नालेसफाई करावी; महेश साळुंखे यांनी केली मागणी
पनवेल दि.०५ : स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी पनवेल शहरात पाहणी केली असता नुकत्याच पडलेल्या पावसात जागो जागी पाणी साचल्याचा अनुभव आला आहे. पावसाळा उशीरा सुरु झाला असताना सुद्धा पनवेल मशील गटारे व्यवस्थीत साफ न केल्यामुळे पनवेलची अवस्था तुंबल्यासारखी झालेली आहे. टपालनाका परीसर, पंचरत्न सर्कल, व्ही के हायस्कूल परीसर, मार्केट यार्ड परीसर या ठिकाणी फूटभर पाणी साचलेले आहे. अजून जोरदार पावसाला सुरु काल ही झालेली नाही तर पाणी साचव्यात सुरुवात झालेली आहे. पनवेल महानगरपालीकेद्वारे दोन वेळा स्वच्छता केली जाते मग नाले सफाई वेळेवर केलेली गेली नाही म्हणून जागोजागी रस्त्यांवर तळ्यांसारखे पाणी साचलेले आढळून येत आहे. तरी महानगरपालीका प्रशासनाने युद्ध पातळीवर त्वरीत नालेसफाई करावी, अशी मागणी महेश साळुंखे यांनी केली आहे