*सिडकोचा नियोजन शून्य विकास*
*नवघर,उरण येथील सिडकोच्या नियोजन शून्य विकासामुळे येथील प्रकल्पग्रस्त गावांना गृहीत धरून आपल्याच मर्जितील ठेकेदारा मार्फत विकासाची गंगा आपल्या दारात आणल्याचा टेंभा मिरवणा-या सिडको अधिका-यां मार्फत खरोखरच्या गंगा,यमुना,गोदावरी नद्यांचा संगम करून येथील जनतेच्या दारापर्यंत आणण्याची किमया मात्र सिडको अधिका-यां मार्फत झाली आहे त्यांचे ज्वलंत उदाहरण गेली चार-पाच वर्षे येथील नागरिकांना जवळून पाहवयास मिळत आहे आज त्याचा प्रत्यय पुन्हा आला असून आज गेल्या दोन/चार दिवसापासून संततधार पडणा-या पावसामुळे तसेच समुद्राच्या भरती मुळे नवघर गावासह परिसरात नद्यांच स्वरूप प्राप्त झालेले असून सिडको आणि सिडकोच्या अधिका-यांचे पितळ पुन्हा एकदा उघडे पडले या गेंड्याच्या कातडीच्या सिडको प्रशासनाला वारंवार येथील परिस्थीती दाखवून आणि माहित असून देखील काहीच उपाययोजना करताना दिसत नाहीत फक्त कागदावरचे घोडे मिरवून भरतीच्या तसेच पावसाच्या पाण्याचे नियोजन केल्याचा कागदोपत्री आव आणण्यातच धन्यता मानण्यात मगरूम असताना दिसतात तर प्रत्येक वर्षी नालेसफाई तसेच समुद्राच्या व पावसाचे पाणी गावात साचणार नाही म्हणून केलेली कागदावरची उपाययोजना तसेच वरचेवर केलेली थातूरमातूर पावसाळी नालेसफाई झाल्याचे दाखवून भरमसाट बिले तर काढली जात नाहीत न अशी शंका येथील सिडको प्रकल्पग्रस्त ग्रामस्थ काढत असून या सिडकोच्या पावसाळी काढण्यात येत असलेल्या कामांमध्ये मोठे रॅकेट तर कार्यरत नाहीत अशी कुजबुज येथील नागरिक करत आहेत तरी याची उच्चस्तरीय चौकशी करून गांवाना भरणा-या भरतीच्या पाण्याची तसेच पावसाच्या पाण्याचा कायमस्वरूपी योग्यप्रकारे निचरा व्हावा अशी उपाययोजना सिडकोने करावी एवढीच माफक इच्छा आज संतप्त नवघर ग्रामस्थांनी आज गावात गुढघ्याभर भरलेल्या पाण्याची पाहणी करण्यास आलेल्या ए.ई.अभय वाहने या सिडको अधिका-या जवळ पुन्हा एकदा केली आहे !!*