आयुष्यातील जगण्याचा आनंद गुरू देत असतात.
उरण दि 14
महात्मा गांधी विद्यालय दिघोडे येथे गुरुपौर्णिमे निमित्त कोकण मराठी साहित्य परिषद उरणचे कविसंमेलन संपन्न झाले .
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य रायगडभूषण प्रा.एल.बी.पाटील हे मार्गदर्शन करताना म्हणाले की, आपण आपलं आयुष्य असताना त्या जगण्याचा खरा आनंद आपले गुरू देत असतात.गुरु मुळेच आपल्याला ज्ञान मिळते. आपल्या आयुष्यात गुरुचे स्थान अनन्य साधारण आहे असे सांगत गुरु तत्वा विषयी त्यांनी माहिती दिली.यावेळी घेण्यात आलेल्या कविसंमेलनात प्रा.एल.बी. पाटील यांनी आगरी बोलीतील विनोदी कविता सादर करून वेगळी रंगत आणली. तर लोकशाहीर मोरेश्वर म्हात्रे यांच्या शाहिरी ढंगाच्या कवितांनी विद्यार्थ्यांत जोश भरला.रंजना केणी ,एम. एस. थळी,यांच्या निसर्ग कविता,भगवान पोसू ,व्ही.डी.बडगुजर, स्नेहा कोळी यांच्या सामाजिक कवितांनी कविसंमेलन रंगतदार केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष
मुख्याध्यापक नाथा नाईक यांनी अध्यक्षीय भाषणात गुरूचे महत्त्व सांगितले. तर जितेंद्र पिंगळे सरांनी कवितेतून कवीचा जन्म ही कल्पना छान मांडली.यावेळी एस.टी. फळे,डी.के.चव्हाण ,पी.पी घरत, एम.जी .शिवभगत, एल.एल.हंबिर,प्रतीक्षा मंदार यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन रंजना केणी यांनी केले.