नवीन पनवेल येथे आर्या निवास हॉटेल चे उदघाटन
पनवेल /प्रतिनिधी
नवीन पनवेल येथील सेक्टर 1 मध्ये आर्या निवास हॉटेल चे नुकतेच उदघाटन करण्यात आले. या परिसरात आजू बाजूला ऑफिस, हॉस्पिटल, दुकाने आहेत या परिसरात नाश्ता जेवण साठी जवळपास हॉटेल उपलब्ध नसल्यामुळे आर्या निवास हॉटेल झाल्याने खवय्या साठी सोय झाली आहे. साउथ इंडियन पद्धतीचे सर्व पदार्थ आर्या निवसा मध्ये मिळणार आहे हॉटेल मालक अशोक कुमार रेड्डी यांनी उच्च शिक्षण घेतलेले असून सुद्धा नोकरी न करता आपली पसंती हॉटेल व्यवसायाला दिली आहे. उद्घाटनाच्या दिवशी पूर्ण दिवस सर्व नागरिकांना तसेच गरीबना मोफत नाश्ता जेवण देण्यात आले. व्यवसाय करत असताना सामाजिक उपक्रमही आम्ही नेहमी राबवत असतो असे मत हॉटेल व्यवसायक अशोक कुमार रेड्डी यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.