नागरिकांच्या जीविताचे व मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी अखेर पोलिसांनी खड्डे बुजवले
तळोजा midc येथून अंबरनाथ डोंबिवली कडे जाणाऱ्या रोडवरील igpl चौक ते नागझरी गाव या दरम्यानचे रोडवरील 1200 मीटर रोड अत्यंत खराब असून चार ते पाच ठिकाणी दीड ते दोन फूट खड्डे होते . ते खड्डे भरण्या बाबत वारंवार midc प्रशासना कडे पाठपुरावा केला परंतु सदर रस्त्याबाबत स्थानिक शेतकरी व midc यांच्यात नुकसान भरपाई देण्यावरून मतभेद असल्याने सदर स्थानिक शेतकरी रस्ता दुरुस्तीस विरोध करतात .
गेले 8 ते 10 दिवसापासून सतत चालू असलेल्या पावसाने पाणी साचल्यामुळे अनेक वेळा वाहतूक कोंडी झाली सदर वेळी खड्ड्यात कोणीही वाहन चालक गाडी घालत नसल्यामुळे वाहतूक कोंडी होत असे तेव्हा सात ते आठ कर्मचारी दोनशे मीटरच्या अंतरावर उभा राहून रोड दुभाजकाचे काम करून वाहनचालकांना पुढे जाण्यास मार्गदर्शन करत असे . सदर अंमलदार सतत पाण्यात उभे राहून कर्तव्य करत असल्यामुळे अनेक पोलिस कर्मचाऱ्यांना पायाला चिखल्या पडण्याचे विकार निर्माण झाले म्हणून आज रोजी वाहतूक शाखेच्या स्तरावर साधनसामग्री उपलब्ध करून सदर पोलीस अंमलदारांनी तीन ठिकाणचे खड्डे बुजवण्याचे काम केले या कामामुळे दररोज आपला जीव मुठीत घेऊन जाणारे वाहनचालक यांनी समाधान मानून या वाहतूक पोलिसांचे आभार मानले
माहितीस्तव सादर