अभिजीत पाटील यांची काँग्रेस शहर जिल्हाध्यक्षपदी निवड
पनवेल, दि.26 ः
काँग्रेस पक्षाध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांच्या आशिर्वादाने आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या मान्यतेने काँग्रेसचे धडाडीचे युवा नेते अभिजीत पाटील यांची पनवेल शहर जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांचे सर्वत्र राजकीय स्तरांमध्ये अभिनंदन केले जात आहे.
रायगड जिल्ह्यात त पनवेल तालुक्यामध्ये काँग्रेसचे कार्य काळात पोचण्यासाठी व काँग्रेसची विचारधारा शहर तसेच ग्रामीण परिसरामध्ये पोहोचण्यासाठी पनवेल मधील धडाडीचे युवा नेते अभिजीत पाटील यांची पक्षाने कार्याची दखल घेऊन पनवेल जिल्हा शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली राज्यात काँग्रेसची सत्ता असो वा नसो पण काँग्रेसची विचारसरणी ही बांधिल असून काँग्रेस तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम अभिजीत पाटील हे गेले अनेक वर्ष करीत आहेत पनवेल शहर अध्यक्ष पदाची धुरा आता त्यांच्याकडे आली असल्याने त्यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे यावेळी बोलताना ते म्हणाले की काँग्रेस विचारसरणीशी बांधिलकी मानणारी मी व माझ्या घरातील तिसरी पिढी आहे. आम्ही कधीच पदाच्या अपेक्षेने पक्षकार्य केलं नाही. तथापि, पद हे साध्य नसून विचार रुजवण्याचं साधन आहे अशा भूमिकेतून मी याकडे पाहतो. देशातील विद्यमान फॅसिस्ट वातावरणात आज हा पुरोगामी, निधर्मी विचार पुनःश्च पसरवण्याची नितांत आवश्यकता आहे. मी आणि माझे सहकारी त्यासाठी आमच्या पातळीवर अथक प्रयत्न करु याची हमी मी देतो आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पक्षश्रेष्ठी मला निरंतर बळ देतील यात मला कणभरही शंका नाही. पक्ष अडचणीच्या काळातून जात असताना माझ्या खांद्यावर ही जबाबदारी येणं ही माझ्यावर असलेल्या विश्वासाची पोचपावती आहे असं मी समजतो. अभिजीत पाटील यांच्या पनवेल शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत पक्षश्रेष्ठींचे आभार मानून धन्यवाद दिले आहेत.