मेजर राजेश पाटील यांच्या हस्ते ग्रामपंचायत गोरठण बुद्रुक येथे ध्वजारोहण सोहळा उत्साहात साजरा…..
खोपोली / प्रतिनिधी – शीतल पाटील
भारताच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष संपूर्ण भारतात अगदी आनंदात साजरा करत असताना प्रत्येक गावात ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या तिन्ही दिवशी सरकारी कार्यालयात ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करून संपन्न केला ग्रामपंचायत गोरठण बुद्रुक येथे दि. 13 ऑगस्ट रोजी जेष्ठ नागरिक गणपत चिंधू पाटील यांच्या हस्ते तर दी. 14 ऑगस्ट रोजी गावचे सुपुत्र मेजर राजेश मोतीराम पाटील यांच्या हस्ते तर दि.15 रोजी ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत गोरठण बुद्रुक सरपंच विक्रांत मोतीराम पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले मेजर राजेश मोतीराम पाटील 2000 सली सैन्यात सामील झाले होते तेव्हा पहिली पोस्ट श्रीनगर मध्ये झाली ती तारीख 11 जुलै 2000 होती तर रँक हवलदार मेजर ही होती त्यानंतर वर्ष 2000 ते 2003 जम्मू आणि काश्मीर 2003 ते 2006 चंदिगड 2006 ते 2009 छत्तीसगड 2009 ते 2010 आसाम 2010 ते 2015 फोर्स रॅपिड ॲक्शन फोर्स 2015 ते 2018 गडचिरोली सध्याची ड्युटी 2018 ते 2022 ठिकाण जम्मू-काश्मीर आहे यांच्याबरोबर सार्थ अभिमान असल्यामुळे ग्रामपंचायत गोठण बुद्रुक तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला अनेकांनी मेजर राजेश यांच्याबरोबर सेल्फी काढून त्यांचं कौतुक केलं आणि त्यांच्या कार्याला सलाम केला भारत माता की जय या घोषणांनी सारा परिसर दणाणून सोडला त्यावेळी मेजर राजेश मोतीराम पाटील यांचे वडील मोतीराम रामजी पाटील यांच्या दोन्ही मुलांना सन्मान मिळाल्यामुळे त्यांच्या आनंदाला पारा उरला नाही त्यांचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले. सादर ठिकाणी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच एल बी पाटील माजी तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष पाटील ज्येष्ठ नागरिक एस के पाटील गणपत पाटील साधू राम पाटील अनंत पाटील एम आर पाटील दगडू पाटील मोतीराम मारुती पाटील माजी सरपंच महेश पाटील राकेश जाधव शशिकांत पाटील सिताराम पाटील ऍड रमेश पाटील पदा शेठ पाटील चंद्रकांत पाटील तंटामुक्ती अध्यक्ष भालचंद्र पाटील गावचे पोलीस पाटील विद्याधर जाधव आर डी सी सी बँक व्यवस्थापक राजेंद्र पाटील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर शिंदे डॉक्टर मानसी पाटील व त्यांचे सहकारी राजीव शाळा विद्यार्थी शिक्षक संदीप पाटील प्रसाद वाघमारे तरुण वर्ग महिला बचत गट ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेविका प्रतिमा खैरे आदी मान्यवर उपस्थित होते.