स्थानिक रिक्षामालक कलंबोली येथील रिक्षानाक्याची झालेल्या दुरावस्थेची तातडीने दखल घेऊन नियोजन करा ः शिवसेना तालुका प्रमुख विश्वास पेटकर
पनवेल, दि.22 (संजय कदम) ः कळंबोली येथील स्थानिक रिक्षा चालक स्टील मार्केट जीविका हॉटेल येतील रिक्षानाक्याची अत्यंत दुरावस्था झाली असून सगळीकडे पाणीच पाणी तुंबले आहे,त्यामुळे रिक्षा मालाक तसेच रिक्षा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो, तरी या दुरावस्थेची तातडीने दखल घेवून नियोजन करावे अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा पनवेल महानगरपालिकेला शिवसेना तालुकाप्रमुख विश्वास पेटकर यांनी दिला आहे.
उपजिल्हाप्रमुख रामदासदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुकाप्रमुख विश्वास पेटकर यांनी हे निवेदन पनवेल महानगरपालिका प्रभाग(9)चे वार्ड अधिकारी कवठे यांना दिले. यावेळी दिलीप पाटील (मा.सरपंच), हिरामण भोईर, मा उपविभागप्रमुख, अरविंद कडव (शहर संघटक), विवेक गडकरी शहर संघटक, राणा देवरमनी (शाखाप्रमुख) काशीनाथ पाटील शाखाप्रमुख , प्रदिप पाटील उपशाखा प्रमुख व रिक्षामालक मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रभाग अधिकारी कवठे यांनी तक्रारीची दखल घेत तातडीने निर्णय घेवून योग्य कारवाई करतो असे आश्वासन दिले.