कामोठे शहरातील गंभीर समस्या तातडीने सोडवण्याची शिवसेनेची महानगरपालिके कडे मागणी
पनवेल दि. २४ :- कामोठे शहरात सांडपाणी वाहून नेण्याऱ्या मलनिसारन वाहिन्याची समस्या गंभीर झाली असून या संदर्भात पनवेल महानगर पालिकेने तातडीने जेट्टींग मशीन , पॉवर बकेट आणि मलनिसारानं वाहिन्यातुन मळ काढण्यासाठी लागणारी सक्शन गाडी साधने उपलब्ध करून द्यावी अशी मागणी कामोठे शिवसेनेच्या वतीने पनवेल महानगरपालिके कडे करण्यात आली आहे .
कामोठे शिवसेना शहर प्रमुख राकेश गोवारी यांच्या मार्गदर्शनाखाली,प्रथम नागरिकांच्या समस्येला प्राधान्य याप्रमाणे कामोठे उप शहर प्रमुख सचिन मनोहर त्रिमुखे यांनी पनवेल महानगर पालिका उप आयुक्त सचिन पवार यांची भेट घेतली या वेळी उप विभाग प्रमुख प्रशांत आनंदे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना कामोठे उप शहर प्रमुख सचिन मनोहर त्रिमुखे यांनी सांगितले की , कामोठे शहरातील गंभीर समस्या असून प्रत्येक सेक्टर मध्ये परिसरातील राहणाऱ्यांची लोकसंख्या फार मोठी प्रमाणात वाढली असून तसेच या सेक्टर मध्ये सांडपाणी वाहून नेणारे मलनिसारानं वाहिन्या यांची क्षमता छोटी असल्या कारणाने दरवषी सांडपाणी रस्त्यावर आलेले निदर्शनास येते तरी पनवेल महानगर पालिका तर्फे कामोठे शहरासाठी जेट्टींग मशीन , पॉवर बकेट आणि मलनिसारानं वाहिन्यातुन मळ काढण्यासाठी लागणारी सक्शन गाडी अशा प्रकारे कामोठे शहरासाठी उपलब्ध करून द्यावेत. कारण कामोठे मधील सिडको कडे आता सध्या एकच जेट्टींग मशीन,सक्शन गाडी आणि पॉवर बकेट असून ती कधी हि खराब होउन त्यात काम निघते आणि एक आठवडा मशीन बंद असल्यामुळे काम होत नाहीत त्यामुळे रहिवाश्याना खूप त्रास सहन करावा लागत आहेत . तरी कामोठे मधील हा खूप खंबीर प्रश्न आहे आपण लवकरात लवकर निर्णय घेउन समस्या सोडवावी अशी मागणी केली असता पनवेल महानगर पालिका उप आयुक्त सचिन पवार त्यांनी सांगितलं की लवकरात लवकर ह्या मागण्या पूर्ण केल्या जातील असे आश्वासन त्यांनी दिले .
फोटो – सचिन त्रिमुखे