विमानतळासह पनवेलच्या शहर पोलीस स्टेशन जागेचा प्रश्न सोडवण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा सुरु – पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग
- पनवेल दि.१९ :नव्याने होत असलेला विमानतळ त्याचप्रमाणे पनवेल शहर पोलीस स्टेशनच्या जागेचा प्रश्न सोडवण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरु असल्याची माहिती नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग यांनी पनवेल येथे आयोजित नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत परिमंडळ 2 मधील मुद्देमाल हस्तांतरण आणि आयएसओ मानांकन प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात दिली.
यावेळी प्रसारमाध्यांशी बोलताना पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग यांनी सांगितले कि, विमानतळासह पनवेलच्या शहर पोलीस स्टेशन जागेचा प्रश्न सोडवण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा सुरु असून यासंदर्भात सिडकोने नवीन विमानतळ परिसराचा आराखाडा प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये प्रस्तावित पोलीस ठाणे सुद्धा आहे. विमानतळ बनण्यास अजून अवकाश असल्याने त्या जागेसंदर्भात सुद्धा आम्ही शासनदरबारी पाठपुरावा करतो आहे. नवी मुंबई मध्ये सिडकोने काही ठिकाणी पोलीस स्टेशन [उभारणी साठी जागा दिल्या आहेत तरीपण अजून २ ते ३ पोलीस स्टेशनच्या जागेचा प्रश्न प्रलंबित आहे त्यासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. त्यामध्ये प्रामुख्याने पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या स्वतःच्या जागेचा प्रश्न निकाली काढण्यासाठी आम्ही लक्ष घातले असल्याची माहिती पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग यांनी दिली आहे.
फोटो : पोलीस स्टेशनच्या जागेसंदर्भात प्रसारमाध्यांना माहिती देताना पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग