पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीत नवरात्री उत्सव सणासह ईद ए मिलाद सणाच्या अनुषंगाने केली दंगा काबू योजनाची रंगीत तालीम
पनवेल दि २७, (संजय कदम): पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीत नवरात्री उत्सव सणाचे व ईद ए मिलाद सणाच्या अनुषंगाने शेडुंग टोल नाका येथे आज दंगा काबू योजनाची रंगीत तालीम पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.
सदर दंगा काबू योजना रंगीत तालीम मध्ये पनवेल तालुका पोलीस ठाणेकडील 02 पोलीस निरिक्षक , 05 सहाय्यक पोलीस निरीक्षक , 03पोलीस उपनिरीक्षक , 26 पुरूष/महिला पोलीस अंमलदार हजर होते. तसेच नवीन पनवेल वाहतूक शाखेचे 02 पोलीस अंमलदार, नवीन पनवेल फायर ब्रिगेडचे 01 अधिकारी 04 कर्मचारी, ऍम्ब्युलन्स वरील कर्मचारी, बिट मार्शल चे पोलीस अंमलदार सहभागी झालेले होते. नवरात्री उत्सव सणाचे व ईद ए मिलाद सणाच्या अनुषंगाने आयोजित दंगा काबू योजनेची रंगीत तालीम शेडुंग टोल नाका येथे पार पडल्याने कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडल्यास हे पथक अवघ्या काही वेळेतच सदर ठिकाणी दाखल होऊन तेथील परिस्थिती सुरळीतपणे हाताळेल अशी माहिती अधिकारी वर्गाने दिली आहे.