महाराष्ट्र बिल्डर असोसिएशनच्या अध्यक्षपदी आनंद पाटील यांची नियुक्ती
पनवेल दि.२७ (संजय कदम):
महाराष्ट्रीयन बिल्डर असोसिएशनच्या अध्यक्षपदी आनंद पाटील सर्वानुमते निवड जाहीर करण्यात आल्या नंतर उपस्थित पदाधिकारी व सदस्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
दरवर्षीप्रमाणे असोसिएशनची यंदाची नवीन कार्यकारिणी मंडळाची निवड करण्यात आली. यात आनंद विलासराव पाटील यांची अध्यक्षपदी म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्या संदर्भातील एक परिपत्रक जारी करण्यात आले. त्याचप्रमाणे महासचिव म्हणून हितेश सावंत आणि खजिनदार म्हणून महेश माटे यांची निवड करण्यात आली. आनंद पाटील यांनी मावळते अध्यक्ष संतोष आंबवणे यांच्या कडून कार्यभार स्वीकारला. यावेळी त्यांनी असोसिएशनची पुढील वाटचाल कशी असेल त्याच प्रमाणे नवीन आवाहने कशी सोडवता येतील यावर चर्चा करण्यात आली. या प्रसंगी ज्येष्ठ सदस्य संग्राम पाटील, के. के. म्हात्रे, मधू पाटील तसेच मावळते महासचिव बाबासाहेब भोसले आणि खजिनदार लक्ष्मण साळुंखे तसेच मीडिया प्रमुख राजेन्द्र कोलकर तसेच प्रवीण शेट्ये, अजित येलमार,.आशिष कवडे, सुनील ठोंबरे, उत्तम येलमार, संजय इंगळे आणि पवन देवलकर आदी सदस्य उपस्थित होते