- आगामी सर्व सण- उत्सव साजरे करण्यासाठी लोकांचा उस्फुर्त सहभाग महत्वाचा – वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर
- पनवेल दि .०९ : आगामी साज-या होणा-या ईद-ए-मिलादसह इतर सण व उत्सव यात सर्व जाती धर्माच्या लिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर यांनी पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतील ईद-ए-मिलाद अनुषंगाने वावंजे चौकी येथे घेतलेल्या बैठकीत केले . या बैठकी करीता एकुण 07 मज्जित व दर्गा पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर यांनी सांगितले की , मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ध्वनिक्षेपकाबाबतच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे. नमाज पठणाचे वेळी रस्त्यावर गर्दी करू नये. रस्त्यावर कोणीही नमाज पठण करणार नाहीत. आणलेली वाहने व्यवस्थित पार्क करावेत, स्वयंसेवक नेमण्यात यावेत. जुलुस विहित वेळेत विहित मार्गानेच जाईल याची दक्षता घ्यावी, जुलुसमध्ये सहभागी हे वाहतुक नियमांचे उल्लंघन करणार नाहीत याची दक्षता घ्यावी.जुलुसमध्ये जास्तीत जास्त स्वयंसेवक नेमावेत जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही. मिरवणुकीच्या वेळी घातक शस्त्र जवळ बाळगू नयेत, रस्त्यावर फटाके वाजवु नयेत.मिरवणूकीमध्ये सहभागी मिरवणूकीचे संपूर्ण कालावधीत कोणत्याही प्रकारच्या आक्षेपार्ह अथवा भावना भडकविण्याचया घोषणा देवू नये, फलक, देखावे, बॅनर प्रदर्शित करु नयेत ज्यामूळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. याची दक्षता घ्यावी. असे आवाहन सुद्धा वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर यांनी केले आहे .
फोटो – वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर मार्गदर्शन करतांना