पनवेल, कळंबोली, कामोठे मध्ये शिवसैनिकांनी मारुतीरायाच्या साक्षीने केले “मशाल” चे स्वागत
पनवेल दि १४ : शिवसेनेला धगधगती मशाल हे चिन्ह मिळताच शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली पनवेल विधानसभा मतदार संघातील पनवेल शहर, कळंबोली शहर, कामोठे शहर येथे शिवसैनिकांनी जल्लोष करत मारुतीरायाची साक्षीने पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांचा जयघोष करत मशालीचे स्वागत केले.
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे मुळ चिन्ह गोठवल्यानंतर अंधेरी पोटनिवडणुकी साठी शिवसेनेला मशाल हे चिन्ह दिले आहे. पनवेल विधानसभा मतदार संघातील पनवेल शहर, कळंबोली शहर, कामोठे शहर येथे शिवसैनिकांनी जल्लोष करत मारुतीरायाची साक्षीने चिन्हाचे स्वागत केले आहे. यावेळी शिवसेना जिल्हासल्लागार शिरीष बुटाला, महानगर समन्वयक दिपक घरत, पनवेल शहर प्रमुख प्रवीण जाधव, कामोठे शहर प्रमुख राकेश गोवारी, पनवेल मा. नगरसेवक विश्वास म्हात्रे, पनवेल उपशहर प्रमुख अबरार मास्टर, सुजान मुसलोंडकर, उपशहर प्रमुख कामोठे भरत शिंदे, उमेश खेडेकर, सचिन त्रिमुखे, दिपक पाटील, पनवेल विभाग प्रमुख अमित माळी, प्रदीप माखेजा, जुनेद पवार, नूर वाईकर, यतीन मानकामे, किशोर सावंत, कामोठे विभाग प्रमुख नितिन भेंडरे, कळंबोली शहर संघटक अक्षय साळुंखे, कळंबोली शहर संघटक अरविंद कडव, कामोठे शहर संघटक संतोष गोळे, कळंबोली उपशहर प्रमुख सूर्यकांत म्हसकर, विभाग प्रमुख महेश गुरव, युवासेना विधानसभा अधिकारी पराग मोहिते, महिला आघाडी कळंबोली शहर संपर्क संघटिका सौ. रत्नमाला शिंदे, पनवेल शहर संघटिका सौ. अर्चना कुळकर्णी, कळंबोली शहर संघटिका सौ. ज्योति मोहिते, कामोठे शहर संघटिका सौ. संगीता राऊत आदि शिवसैनिक तथा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो : पनवेल, कळंबोली, कामोठे मध्ये शिवसैनिकांनी केले मशालचे स्वागत