राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उरण तालुका युवक अध्यक्ष कैलास भोईर यांनी दिला आपल्या पदाचा राजीनामा
उरण दि 18 : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उरण तालुक्यातील सक्रीय कार्यकर्ते तथा उरण तालुका युवक अध्यक्ष कैलास मोरेश्वर भोईर यांनी आपल्या पदाचा राजीनामा वरिष्ठांकडे पाठविला असून पक्ष कामासाठी वेळ देता येत नसल्याचे कारण सांगून त्यांनी हा राजीनामा दिला आहे. कैलास भोईर हे चाणजे ग्रामपंचायतचे माजी सदस्य असून त्यांच्या पत्नी किंजल कैलास भोईर या सध्या चाणजे ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्या आहेत.
कैलास भोईर यांनी युवक अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला त्यात ते म्हणतात की मी, कैलास मोरेश्वर भोईर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे. पक्ष अध्यक्ष श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांचा आदर्श सदैव माझ्यासोबत आहे व त्यांचे मार्गदर्शन या सर्व प्रवासात मला प्रेरणा देत होते व देत राहतील आदरणीय. सौ. भावणाताई घाणेकर व आदरणीय श्री. प्रशांतभाऊ पाटील साहेब यांनी माझ्यावर विश्वास दाखवूण माझी उरण तालुका युवक आध्यक्ष म्हणून नेमणुक केली होती. सद्य स्थिती पहाता मला पक्ष कामासाठी वेळ देता येत नाही त्या कारणे मी माझ्या उरण तालुका युवक अध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. कृपया स्विकार करावा ही नम्र विनंती असे कैलास मोरेश्वर भोईर उरण तालुका युवक अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष यांनी आपल्या राजीनाम्यात नमूद केले आहे.