युवान गायकवाड यांनी केले शैक्षणिक साहित्य वाटप.
उरण दि 20 :सामाजिक कार्यकर्ते सुप्रियाताई गायकवाड यांचे पुत्र युवान गायकवाड यांनी सामाजिक बांधिलकी जपत रानसई प्राथमिक शाळेतील आदिवासी शालेय विद्यार्थ्यांना गोड खाऊंचे वाटप तसेच टिफिन बॅग्स व सोबतच शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. यावेळी युवानच्या आई सुप्रियाताई गायकवाड, प्रियंका शिंगटे, निर्मला आळेकर, रायगड भूषण राजू मुंबईकर, प्रभू, अश्विन, रानसई प्राथमिक शाळेचे शिक्षिका कडू मॅडम आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते. सामाजिक बांधिलकी जपत युवान गायकवाड यांच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य वाटप व खाऊ वाटप करण्यात आल्याने आदिवासी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले.