कॉंग्रेस भुवन सभागृहात दिवंगत नेत्यांच्या प्रतिमा
पनवेल प्रतिनिधी
रायगड जिल्हा कॉंग्रेसच्या अध्यक्ष पदाची धुरा सांभाळल्यापासून महेंद्रशेठ घरत हे रायगड जिल्ह्यात कॉंग्रेसचे गतवैभव प्राप्त करण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यासाठी युवक, महिला, जेष्ठ कार्यकर्ते या सर्वांना सोबत घेऊन पक्ष वाढवण्याचे प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर जेष्ठ नेते ज्यांनी कॉंग्रेस पक्षासाठी आयुष्य खर्च केले अशा दिवंगत नेत्यांकडून नेहमीच प्रेरणा मिळावी यासाठी दिवंगत नेत्यांच्या कॉंग्रेस पक्ष जिल्हा मुख्य कार्यालय अलिबाग येथे प्रतिमा असाव्यात अशी त्यांची मनोमन इच्छा होती. मंगळवार दिनांक १ नोव्हेंबर २०२२ रोजी रायगड जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या आढावाबैठकी नंतर दिवंगत माजी आमदार माणिकराव जगताप, दिवंगत माजी आमदार मधुशेठ ठाकूर तसेच दिवंगत कामगार नेते,श्याम म्हात्रे यांच्या प्रतिमा बॅरीस्टर अंतुले भवन, सभागृह अलिबाग येथे लावण्यात आल्या.
याप्रसंगी प्रदेश चिटणीस अॅड. प्रवीण ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर, महिला अध्यक्षा अॅड. श्रद्धाताई ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष किरीट पाटील, मच्छीमार संघटनेचे मार्तंड नाखवा,मानवधिकार समितीच्या सौ. कविता ठाकूर,पनवेल तालुका अध्यक्ष- नंदाराज मुंगाजी, खालापूर तालुका अध्यक्ष कृष्णा पारंगे, पेण तालुका अध्यक्ष अशोक मोकल, माणगाव तालुका अध्यक्ष विलास सुर्वे, तळा तालुका अध्यक्ष शरद भोसले, मुरुड तालुका अध्यक्ष सुभाष महाडीक, सुधागड ता. अध्यक्ष बाबा कुलकर्णी, अलिबाग ता. अध्यक्ष भास्कर चव्हाण, माजी तालुका अध्यक्ष योगेश मगर, अॅड. के.एस. पाटील. आदी उपस्थित होते.