किल्ले पहाणी बक्षीस वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न
पनवेल प्रतिनिधी
वशेणी इतिहास संपादकीय मंडळाकडून आयोजीत केलेल्या
मातीचे किल्ले पहाणी उपक्रमाचा
बक्षीस वितरण कार्यक्रम राधाकृष्ण मंदिर, वशेणी, तालुका उरण येथे उत्साहात संपन्न झाला.या वेळी डाॅक्टर रविंद्र गावंड, जयदास ठाकूर, गणेश खोत,बळीराम म्हात्रे, संदेश गावंड,अनंत पाटील, पुरूषोत्तम पाटील,गणपत ठाकूर, हरेश्वर पाटील, दिपक म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी सहभागी 30 स्पर्धकांचा प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.तर विजेत्यांचा प्रमाणपत्र व विशेष भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
आपली दूर्गबांधणी कला दाखवणारे कुमार निसर्ग म्हात्रे,कुमार साई समाधान म्हात्रे,तन्मय मनोहर पाटील,आर्या प्रविण ठाकूर,आणि पुष्कर संजय पाटील यांची उत्कृष्ट किल्ले प्रतिकृती म्हणून निवड करण्यात आली.
लक्षवेधी प्रतिकृती म्हणून स्वरा संदेश म्हात्रे,श्रध्दा शिवा पाटील यांची निवड करण्यात आली. तर उत्तेजनार्थ प्रतिकृती म्हणून आरोही संदेश पाटील, तनिष तुषार ठाकूर,रूपेश रोशन पाटील यांची निवड करण्यात आली.किल्ले पहाणी परीक्षणाचे काम वशेणी इतिहास संपादकीय मंडळाचे कार्यवाहक मच्छिंद्रनाथ म्हात्रे यांनी केले.तर सूत्रसंचालन प्रविण ठाकूर यांनी केले.आभार प्रदर्शना नंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.