जागतिक दिव्यांग सप्ताह निमित्त डॉ.न.मा .जाधव फाउंडेशनच्या बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली
पनवेल प्रतिनिधी सुरेश भोईर
नवीन पनवेल येथील डॉ. न.मा. जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांची विशेष शाळेतील विद्यार्थ्यांची दिनांक ८ डिसेंबर 2022 रोजी दिव्यांग सप्ताह व बौद्धिक अक्षम दिनानिमित्त नवीन पनवेल येथे जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीचे उद्घाटन पोषण आहार पंचायत समिती अधीक्षक महेश खामकर यांच्या हस्ते.करण्यात आले. सकाळी साडेनऊ वाजता रॅली ची सुरुवात शाळेतून करण्यात आली विद्यार्थी शिक्षकांनी दिव्यांगत्व विषयी
जनजागृती रॅलीचे फलक दर्शवीत व जनजागृती संबंधित घोषणा देत लोकांचे लक्ष वेधून घेतले विद्यार्थ्यांच्या पालकांच्या व शिक्षकांच्या हातामध्ये जनजागृती करणारे पोस्टर्स घेऊन जनजागृती करण्यात आली या विद्यार्थ्यांच्याच जनजागृती मध्ये पनवेल वाहतूक पोलीस विभागाने सहभाग घेऊन विद्यार्थ्यांच्या हातात सुरक्षित वाहतुकीच्या नियमांचे पोस्टर्स देण्यात आले होते तसेच रॅली सुरू झाल्यावर रॅली दरम्यान वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना थांबून विद्यार्थ्यांच्या हस्ते गुलाब पुष्प व वाहतुकीच्या नियमांचे बॅनर दाखवून नियम कसे पाळा याबाबत सांगण्यात आले हेल्मेट कंपल्सरी वापरावे याबाबतचे विद्यार्थ्यां मार्फत आव्हान करण्यात आले. सदर रॅली दरम्यान आवश्यक ती खबरदारी व उपाय योजना शालेय प्रशासनाकडून करण्यात आल्या होत्या रॅलीत सहभागी नवीन पनवेल परिसरातील सेक्टर एक पासून सेक्टर 5 सेक्टर 3, व सेक्टर 1/ एस शाळेजवळ येऊन जनजागृती रॅलीची सांगता झाली समाजातील प्रत्येक घटकांना दिव्यांगांच्या प्रति सहानुभूती न दाखवता त्यांना संधी देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रेरित करणे आवश्यक आहे दिव्यांग व्यक्तींच्या समस्या समजावून घेता याव्यात याबाबत समाजात जनजागृती व्हावी अपंगांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांना योग्य ती मदत मिळावी हा रॅली काढण्यामागील शाळेचा प्रमुख उद्देश होता. रॅली सहभागी झालेल्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय नाले यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल वाहतूक पोलीस विभागातर्फे मुलांना चॉकलेट व खाऊ चे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास पनवेल पंचायत समितीच्या पोषण आहार समितीचे अधीक्षक महेश खामकर, डॉ. नंदकुमार जाधव फाउंडेशनचे व्यवस्थापकीय अध्यक्ष डॉ. नंदकुमार जाधव, पनवेल वाहतूक पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी संजय नाले, वाहतूक सहाय्यक पोलीस निरीक्षक खांडेकर संस्थेचे सचिव एस एस. जाधव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दवंग सर, बौद्धिक अक्षम मुलांच्या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रेया जाधव,खांदेश्वर शहर पोलीस स्टेशन चे अधिकारी, वाहतूक विभागाचे कर्मचारी,पालक, शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते