मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर स्विफ्ट कारचा अपघात
पनवेल दि.१८(संजय कदम)
मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवरील मुंबई लेनवर आज सकाळी स्विफ्ट कारचा अपघात झाला असून या मध्ये कार चालक जखमी झाला आहे. स्विफ्ट कार क्रमांक MH 01 DR 7124 हि ती परमीट कार घेऊन चालक राजू कल्याणी गायकवाड (वय 37 वर्षे रा.मुंबई) हा पुणे बाजू कडून मुंबई बाजूस पहिल्या लेन वरून दोन प्रवाश्याना घेऊन जात होता. यावेळी त्याचा त्याचा गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हि कार रस्ता दुभाजकाच्या रेलिंगला जोरात ठोकर देऊन दिल्याने तिचा अपघात झाला. कार रेलिंग मध्ये जोरात घुसल्याने कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सदर अपघातात कार चालक राजू कल्याणी गायकवाड याच्या उजवे हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांना आय आर बी रुग्णवाहिकेने कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटल मध्ये उपचाराकरिता तात्काळ पाठवण्यात आले आहे. तसेच कारमधील दोन प्रवासी यांना काहीएक दुखापत झाली नाही. सदर अपघातामधील अपघातग्रस्त कार IRB हायड्रा क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढून रस्त्याच्या बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत करून देण्यात आली आहे. सदर अपघाताची माहिती पनवेल शहर पोलीस ठाणेस देण्यात आली असून अपघताच्या ठिकाणी RTO इनस्पेक्टर श्री.जाधव व श्री.ढोंबळे आणि स्टाफ तसेच पोलीस केंद्र पळस्पे मोबाईल स्टाफ सह व आय आर बी चा स्टाफ हजर होते.