डोंगर खोऱ्यातील हिरा कोलकत्ता मध्ये चमकला कालिदास हिरवे.
वर्ल्ड फेम न्युज : अमर मांढरे
वाई (सातारा )संपर्क :९६०४३६१६१५
वाई तालुक्यातील मांढरदेवी गावातला हिरा कालिदास हिरवे हा कोलकत्यात चमकला कोलकत्ता मध्ये झालेल्या टाटा स्टील २१ की मी मॅरेथॉन मध्ये या मांढरदेव खेडे गावातल्या हिऱ्याने यश मिळवून महाराष्ट्राचे नाव उज्वल करत आपले सन्मान चिन्ह स्वीकारले
अनेक राज्यांमध्ये या हिऱ्याने आपली चमक दाखवत नाव उज्वल केले तसेच या हिऱ्याला घडवणारे राजगुरू कोचळे सर हे महाराष्ट्रातील होतकरू गरीब विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून खेळाडू म्हणून एक नाव उज्वल करण्याची दिशा दाखवतात. या मार्गदर्शनामुळे खेडेगावातील कालिदास हिरवे अनेक राज्यांमध्ये जाऊन नाव चमकवतोय. या कामगिरीसाठी त्याचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा