कामोठे पोलीस स्टेशनच्या वतीने रेझिंग डे निमित्त रिक्षा चालकांना मार्गदर्शन
पनवेल /प्रतिनिधी
खांदेश्वर स्टेशन येथील रेझिंग डे च्या निमित्ताने स्थानिक प्रकल्पग्रस्त खांदेश्वर रिक्षा चालक मालक यांना नवी मुंबई कामोठे पोलीस ठाण्याचे API धुमाल साहेब व मनोज जाधव साहेब यांनी रिक्षा चालकांना वाहतूक नियमाबाबत प्रबोधन केले
भाडे नाकारणे. गणवेश परिधान करणे. मोबाईलवर न बोलणे. रिक्षा स्टॅन्ड जवळ आस्त व्यस्त रिक्षा उभ्या करणे. नागरिकांची सौजन्याने वागणे. ॲम्बुलन्स ला रस्ता मोकळा करून देणे.
या सर्व सूचना नवी मुंबई कामोठे पोलीस ठाण्याचे ए पी आय धुमाल साहेब यांनी रिक्षाचालकांना दिल्या. तसेच या सर्व सूचनांचा पालन आम्ही रिक्षा चालक काळजीपूर्वक करू. असे आश्वासन स्थानिक रिक्षा चालकांनी धुमाल साहेब यांना दिले.
तसेच तिथे उपस्थित स्थानिक प्रकल्पग्रस्त रिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष. मच्छिंद्र पाटील. रिक्षाचालक. भरत कावले. हनुमान भगत. दीपक पाटील. रवींद्र पाटील. सुरेश पाटील. राम भगत. विलीन धूंद्रेकर.मिलिंद भगत. प्रवीण तेरडे. संदीप तांबडे. श्रीकांत कावळे. अशोक म्हात्रे. सचिन पाटील.कृष्णा तांबडे. मनोहर म्हात्रे. हरीश म्हात्रे. दिनेश भगत. भगवान पाटील. गौरव भगत.योगेश तांबडे.अनिल पाटील.
हे सर्व रिक्षा चालत ते उपस्थित होते.