वाल्मिकी नगर येथील ड्रेनेज लाईन दुरुस्त करण्याची बाळासाहेबांच्या शिवसेनेतर्फे मागणी
पनवेल दि.०३ (वार्ताहर) : पनवेल शहरातील वाल्मिकी नगर वसाहत येथील ड्रेनेज लाईनची अत्यंत दुरावस्था झाली असून हि ड्रेनेज लाईन तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेनेचे पनवेल शहर प्रमुख प्रसाद सोनावणे यांनी पनवेल महानगरपालिकेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात प्रसाद सोनावणे यांनी म्हटले आहे कि, पनवेल महानगरपालिका हद्दीतील वाल्मिकी नगर वसाहत येथील ड्रेनेज लाईनची अवस्था हि खूप गंभीर झालेली आहे. पंतप्रधान आवास योजने अंतर्गत वाल्मिकी नगर वसाहतीचे पुनर्वसन होणार आहे. परंतु असे असले तरीही सद्यस्थितीत वसाहतीतील सर्व नागरिकांना रोज दुर्गंधीचा सामना करावा लागतोय. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी वसाहती मध्ये स्वच्छता करून दिली. परंतु हा विषय तात्पुरत्या साफसफाईने सुटणार नसून सदर ड्रेनेज लाईन दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे हि ड्रेनेज लाईन तातडीने दुरुस्ती द्यावी अशी मागणी प्रसाद सोनावणे यांनी केली आहे.
फोटो : प्रसाद सोनावणे