शिष्यवृत्ती परीक्षेत चिरनेर शाळेतील कुमारी अक्षरा जितेंद्र ठाकूर उरण तालुक्यात प्रथम
प्रतिनिधी नंदकुमार तांडेल
रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील परशुराम धाकू खारपाटील माध्यमिक शाळा चिरनेर येथील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या नुकत्याच जाहीर झालेल्या पूर्व प्राथमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवीच्या गुणवत्ता यादीत सन २०२२ शिष्यवृत्ती परीक्षेत कुमारी अक्षरा जितेंद्र ठाकूर या विद्यार्थीनीने घवघवीत यश संपादन करून उरण तालुक्यात प्रथम क्रमांक तर रायगड जिल्ह्यात चौथा क्रमांक पटकाविला. या यशाने चिरनेर शाळेची गुणवत्ता वाढली आहे. दरम्यान या यशाबद्दल प्राविण्य मिळविलेल्या कुमारी अक्षरा हिचे मार्गदर्शक शिक्षक श्री. रत्नाकर तुकाराम पाटील यांचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.दरम्यान या यशाबद्दल प्राविण्य मिळविलेल्या कुमारी अक्षरा जितेंद्र ठाकूर हिचे शाळा व्यवस्थापन समिती, पालकवर्ग आणि,शिक्षक वृंदाकडून अभिनंदन होत आहे.