कळंबुसरे प्रिमियर लिग २०२३ पर्व दुसरे मध्ये कळंबुसरेची आई भवानी संघ विजेता
उरण प्रतिनिधी : नंदकुमार तांडेल
उरण तालुक्यातील कळंबुसरे गावातील केपिएल लीग २०२३ च्या दुसर्या पर्वाचे विजेता संघ कळंबुसरेची आई भवानी संघ झाला. शुक्रवार दिनांक ६ जानेवारी २०२३ रोजी चालू झालेल्या तीन दिवस आयोजित करण्यात आलेल्या कळंबुसरे प्रिमियर लिग मधील रंगतदार झालेल्या केपिएल लीग फायनल सामन्यामध्ये कळंबुसरेची आई भवानी कर्णधार रोहन पाटील मालक महेश भोईर आणि संघ पियु आणि परी ११ कर्णधार ह्रितिक पाटील मालक दिपेश राऊत यांच्या मध्ये रंगलेल्या फायनलच्या सामन्यात कळंबुसरेची आई भवानी संघाने विजयश्री खेचून आणले. एकूण १२ टीम या स्पर्धे मध्ये सहभागी होत्या. प्रत्येक सामन्यात प्रत्येक संघाचा खेळाडू खिलाडू वृत्तीने चुरशीने खेळला.या वेली सर्व संघ ,मालक ,आयोजक, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे सुंदर बक्षीस समारंभ पार पडले. या लीग दरम्यान शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांनाचे आयोजकांकडून सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे आयोजकांकडून उपस्थित सर्व मान्यवरांचे यथोचित सन्मान करण्यात आले. या वेळी अनेक ग्रामस्थांनकडून खेळांडूवर बक्षिसांची लयलूट करण्यात आली. सामन्याचे सुंदर सूत्रसंचालन श्री नीतेश पंडित,श्री श्याम घरत,श्री राजेंद्र भगत यांनी केले. तसेच पंचाची भूमिका पंच प्रशांत माळी, राजेंद्र घरत, संदीप पाटील यांनी उत्तम प्रकारे पार पडली. या केपिएल लीग २०२३ चे थेट प्रक्षेपण प्राप्ती लाईव्ह यांच्या मार्फत करण्यात आले होते. तसेच या लीग ला अनेकांचे विविध माध्यमातून सहकार्य लाभले. लीगचे उत्तम नियोजन आयोजकांकडून करण्यात आले होते.