पनवेल येथील राकेश दलाल यांचे निधन
नवीन पनवेल : पनवेल येथील राकेश अशोक दलाल यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. ते 43 वर्षांचे होते. त्यांच्यावर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पश्चात पत्नी, मुलगी, आई, भाऊ, असा मोठा परिवार आहे. त्यांचा दहावा विधी शुक्रवार 13 जानेवारी आणि उत्तरकार्य 16 जानेवारी रोजी केले जाणार आहे.