राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सशक्तीकरण संस्था खारघरमध्ये दिव्यांग मुले व व्यक्तीसाठी स्वावलंबन कार्ड
नवीन पनवेल : राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन सशक्तीकरण संस्था खारघरमध्ये दिव्यांग मुले व व्यक्तीसाठी स्वावलंबन कार्ड (युडी आयडी कार्ड) रजिस्ट्रेशन चालू आहे. भारतातील जे व्यक्ती दिव्यांग आहेत त्या सर्वाना दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र प्राप्त करून देण्याकरीता भारत सरकारने एक योजना सुरू केली आहे. ह्या योजनेचे नाव आहे युडी आयडी कार्ड. यामध्ये सर्व दिव्यांगत्वासाठी काम करणाऱ्या राष्ट्रीय संस्था, संयुक्त प्रादेशिक केंद्र मार्फत करण्यात येत असलेली नोंदणी, निदान आणि उपचार शुल्क (युडी आयडी कार्ड) स्वावलंबन कार्ड धारकांसाठी मोफत केले जाईल. कोणत्याही स्तरावरील दिव्यांग मुले व व्यक्तीसाठी ही सेवा मोफत असेल. ज्या दिव्यांग मुले तसेच व्यक्ती कडे दिव्यांगत्व प्रमाणपत्र आहे किंवा ज्यांनी स्वावलंबन कार्ड (युडी आयडी कार्ड) पोर्टलमध्ये नावनोंदणी केली आहे.
दिव्यांग मुले तसेच व्यक्तींना स्वावलंबन कार्ड (युडी आयडी कार्ड) अर्ज दाखल करण्यात मदत करण्यासाठी प्रत्येक राष्ट्रीय संस्था, संयुक्त प्रादेशिक केंद्र मध्ये एक स्वतंत्र काउंटर असेल. तेथून स्वावलंबन कार्ड (युडी आयडी कार्ड) संबंधित सर्व रजिस्ट्रेशनचे काम जाईल. ह्या योजनेदवारे भारत सरकार संगणकीय प्रणालीचा वापर करून भारतातील विविध राज्यात वास्तव्यास असलेल्या सर्व दिव्यांग व्यक्तींचा डेटा प्राप्त करून भारतात एकुण किती दिव्यांग आहेत हे जाणुन घेणार आहे. अणि अशा गरजु दिव्यांग व्यक्तींना सेवासुविधा पुरविण्यासाठी भारत सरकार अशा व्यक्तींना ऑनलाईन पदधतीने एक युनिक सर्टिफिकेट/ आयडी कार्ड प्रदान करणार आहे. ज्याचे नाव युडी आयडी कार्ड असे आहे. ह्या कार्डमुळे देशातील सर्व अणि दिव्यांगाना सरकारकडुन सरकारी योजनांमध्ये काही विशेष लाभ प्रदान केले जाणार आहे. युडी आयडी कार्डचा वापर करून देशातील विविध राज्यांमधील सर्व दिव्यांगांना काही विशेष लाभ प्राप्त होणार आहे. त्यातील एक लाभ असा की जेवढे पण राष्ट्रीय संस्था, संयुक्त प्रादेशिक केंद्रामध्ये व्यावसायिक प्रशिक्षण अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या दिव्यांग विद्यार्थांना पूर्ण अभ्यासक्रम शुल्क फी माफ असेल.