पत्रकार शशिकांत वारीशे यांची झालेली निर्घृण हत्या आणि पत्रकारांवर दिवसेंदिवस होत असलेल्या हल्ल्यांचा पनवेलमध्ये निषेध महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशनची तहसीलदारांना पत्राद्वारे मागणी
पनवेल / प्रतिनिधी
नाणार रिफायनरी प्रकरणात जनतेच्या भावना मांडणारे पत्रकार शशिकांत वारीशे यांची झालेली निर्घृण हत्या आणि पत्रकारांवर दिवसेंदिवस होत असलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशन पनवेलमधील पत्रकार रस्त्यावर उतरले. पत्रकार शशिकांत वारीशे निर्घृण हत्या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयामार्फत चालवावा. तसंच, वारीशे यांची हत्या करणारा पंढरीनाथ आंबेरकर याची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहून त्याला मोक्का लावावा तसेच पत्रकारांवर दाखल होत असलेल्या खोट्या गुन्ह्यांबाबत महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशनच्या वतीने पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांना भेटून निवेदन दिले व या घटनेचा निषेध नोंदवला तसेच आम्हा सर्व पत्रकारांच्या भावना शासनापर्यंत पोहचवाव्यात अशी भूमिका मांडली यावेळी तहसीलदार यांनी देखील आम्ही आपल्या सर्व समस्या शासनापर्यंत पोहचवू अशी ग्वाही दिली. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशनचे जेष्ठ सल्लागार दिपक महाडिक, अध्यक्ष केवल महाडिक, कार्याध्यक्ष संतोष भगत, उपाध्यक्ष सुनील पाटील, सचिव संतोष सुतार, सहसचिव शैलेश चव्हाण, खजिनदार सोनल नलावडे , सदस्य म्हणून नितीन जोशी, विशाल सावंत, निलेश घाग, विद्यासागर ठाकूर, मनोहर पाटील, दिपाली पारसकर, संदिप कलोते, रवींद्र चौधरी, संतोष आमले, चंद्रशेखर भोपी, प्रगती दांडेकर, कमलाकर शेळके आदी उपस्थित होते.