माधव बाग मल्टीडिसिप्लिनरी कार्डियाक केअर क्लिनिक्स् अँड हॉस्पिटल्स् नवीन पनवेल शाखेचे उद्धघाटन
प्रतिनिधी /पनवेल(प्रेरणा गावंड)
हृदयरोगावर विनाशस्त्रक्रिया उपचार करणारी भारतातील अग्रगण्य वैद्यकीय संस्था माधवबाग ,सुमारे ५ दशके लाखो हृदयरुग्णांवर यशस्वी उपचार, शरीरातील मधुमेह, रक्तदाब, कोलेस्टेटॉल आणि ब्लॉकेजेस हृदय उपचार करण्यात यशस्वी दि. 9 फेब्रुवारी रोजी न्यू पनवेल येथील सेक्टर११ ,प्लॉट नंबर १२ ,सिनेराज टॉकीज व नायर हॉस्पिटल च्या बाजूला माधवबाग उपचार केंद्राचे उद्घाटन मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते सयाजी शिंदे प्रमुख पाहुणे पनवेल महानगरपालिका विरोधी पक्षनेते प्रितम जे. म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले.माधव बाग व्यवस्थापन प्रमुख सौ. शिल्पा चंदने, डॉ. सुनिता पाटील श्रीपाद उपासनी (मी. ओ. ओ. माधवबाग),डॉ.निलेश कुलथे (झोनल मेडिकल हेड, माधवबाग) व अतिथी योगेश वालावलकर ,डॉ.गुरुदत्त अमीन (स्ट्रेटिजिक हेड,) मुशांत कुलकर्णी(रिजनल हेड, माधवबाग), आनंद नवले (एडमिन हेड, माधवबाग) व पत्रकार वर्ग मान्य वर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ज्येष्ठ समाजसेवक उद्योजक सचिन चंदने व माधवबाग व्यवस्थापनांच्या वतीने येणाऱ्या सर्व मान्यवरांचे व उपचार घेणाऱ्या रुग्णाचे प्रोत्साहन वाढविण्यासाठी तुळस रोप,पुष्प व पदक स्वागत, सन्मान ,सत्कार करून आभार व्यक्त करण्यात आले
कोट ..
आम्ही फक्त मधुमेह रक्तदाब कोलेस्ट्रॉल आणि ब्लॉकेज याचाच नाही तर तुमच्या हृदयाची संपूर्ण काळजी घेतो आपल्या हृदयाच्या तपासणीसाठी जीवन जगण्याची कला आत्मसात करण्यासाठी आजच आपल्या जवळच्या माधवबाग उपचार केंद्र मध्ये भेट द्या….. माधवबाग उपचार केंद्र तज्ञ शिल्पा चंदने