आपला आधार फाउंडेशनच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी निलेश घाग, तर रायगड जिल्हा महिला अध्यक्षपदी मंदा जंगले यांची नियुक्ती
पनवेल / प्रतिनिधी
आपला आधार फाउंडेशन संस्था ही राजकीय तथा सामाजिक क्षेत्रात नावाजलेली संस्था आहे. संस्थेतर्फे विविध सामाजिक काम केली गेली आहेत व भविष्यात देखील सामाजिक व राजकीय क्षेत्रात वाटचाल करण्याकरिता संस्थापक केवल महाडिक व कायदेशीर सल्लागार प्राजक्ता महाडिक यांच्या मार्गदर्शनाने आपला आधार फाउंडेशनच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी निलेश घाग तर रायगड जिल्हा महिला अध्यक्षपदी मंदा जंगले यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेसाठी भविष्यात काम करून संघटना वाढीसाठी पूर्णपणे प्रयत्न करणार असल्याचे नवनियुक्त पदाधिकारी यांनी सांगितले आहे.