- .१० वी व इ १२ वी च्या परिक्षेस प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यासाठी पनवेल येथे समुपदेशन मेळाव्याचे आयोजन
नवीन पनवेल : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, मंत्रालय, मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये विद्यार्थ्याच्या समुपदेशन मेळाव्याचे आयोजन रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते समुपदेशन मेळाव्याचे उद्धघाटन करण्याचे आदेशित केले आहे.
त्यानुसार इ.१० वी / १२ वी नंतरचे महाविद्यायालयीन शिक्षण व अभ्यासक्रम, महाविद्यायालयीन अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया, कलमापन चाचणी, शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना व कर्ज योजना यांची माहिती, भविष्यातील रोजगाराच्या संधी, व्यक्तिमत्व विकास, नवीन तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण या विषयाची माहिती होण्याकरिता इ.१० वी व इ १२ वी च्या परिक्षेस प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यासाठी शुक्रवार दि.११ मे, २०२३ रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके, नाटयगृह, पनवेल येथे समुपदेशन मेळावा आयोजित केला आहे. त्यामध्ये वरील विषयावर नामांकित वक्त्याकडून समुपदेशन करण्यात येणार आहे.
तरी या मेळाव्यास जास्तीत जास्त संख्येने रायगड जिल्हातील विद्यार्थी व पालक यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन पनवेल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य नि.के.चौधरी यांनी केले आहे