रिक्षात विसरलेला महागडा मोबाईल प्रवासीयांस प्रामाणिकपणे परत केला
पनवेल प्रतिनिधी
१५ /५ /२०२३ कल्याण ते उल्हासनगर रिक्षाने प्रवास करताना दिपक रमेश कापुरे चिचंपाडा कल्याण पुर्व यांचा महागडा मोबाईल रिक्षा चालक मालक असोसिएशन पदाधिकारी रिक्षाचालक प्रताप सरोदे ( डाँन) यांच्या रिक्षात अनावधानाने विसरले.
महागडा मोबाईल हरविला प्रवासी हवालदिल झाले.
रिक्षा चालकांकडे विचारणा केली असता रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशन प्रवासी तक्रार निवारण जनसंपर्क कार्यालयात संपर्क करण्याचे सांगितले तात्काळ
प्रवाशी दिपक कापुरे यांनी रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशन जनसंपर्क कार्यालयात गेले असता सदैव प्रवाशांच्या तक्रार दखल व निराकरण करण्यास तत्पर असलेल्या पदाधिकारी यांनी चौकशी व शोध घेऊन संघटनेचे पदाधिकारी तथा रिक्षाचालक प्रताप सरोदे ( डाॅन )यांचे रिक्षात विसरलेला महागडा मोबाईल प्रामाणिकपणे परत केला.
प्रवासी दिपक कापुरे यांनी हरवलेला मोबाईल परत मिळाला म्हणून समाधान व्यक्त करुन प्रताप सरोदे व रिक्षा चालक मालक असोसिएशन पदाधिकारी यांचे आभार मानले याप्रसंगी जितेंद्र पवार, अनिल जगताप, अरविंद भोसले ,बळिराम जगताप इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
प्रताप सरोदे यांचे सर्वच थरातून कौतुक होत आहे.