पनवेल रेल्वे स्थानकात महिलेची प्रसूती
बाळ आणि बाळंतीण सुखरूप,10 महिन्यातील दुसरी घटना
पनवेल दि.16 (वार्ताहर)- मंगला एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या एका महिलेची पनवेल स्थानकावर प्रसूती होण्याची घटना शनिवारी ( ता.15 ) घडली आहे.प्रवासा दरम्यान वेदना जाणवू लागल्याने रेल्वे स्थानकावर असलेल्या महिलांच्या प्रतीक्षालयात स्थानकावर असलेल्या रेलवे च्या कर्मचाऱ्यांच्या मदती मुळे करण्यात आलेल्या प्रसूती नंतर जन्माला आलेले बाळ आणि बाळंतीण सुखरूप असून दोघांनाही नजदिक च्या रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकातून देण्यात आली आहे.
केरला मधील एर्नाकुलम येथून दिल्ली येथे जाणारी कोव्हीड स्पेशल मंगला एक्स्प्रेस सायंकाळी 5 वाजून 40 मिनिटांनी पनवेल जवळ आली असतात एक्स्प्रेस मधून प्रवास करणाऱ्या डॉली सनी या 25 वर्षीय महिलेस प्रसूती वेदना जाणवत असल्याची माहिती रेल्वे स्थानकावर उपलब्ध असलेल्या 1 रुपी क्लिनिक चे डॉ.विशाल वाणी यांना देण्यात आली.डॉ.वाणी यांनी स्थानकावर उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने वेदनेने व्हीव्हळत असलेल्या मोहिलेंची रवानगी स्थानकावरील महिलांच्या प्रतीक्षा गृहात करत सुरक्षित रित्या महिलेची प्रसूती घडवून आणली.पनवेल रेल्वे स्थानकावर मागील 10 महिन्यात घडलेली ही दुसरी प्रसूती असून नोव्हेंबर 2019 मध्ये देखील मुबंई लोकल ने प्रवास करणाऱ्या एका महिलेची सुरक्षित प्रसूती करण्याची प्रक्रिया डॉ.वाणी यांनी पार पाडली होती.