सन्मान कोविड योद्धांचा…दिवस – रात्र सेवा देणाऱ्या डॉक्टर, शिक्षक, नर्स यांचा राजे प्रतिष्ठान पनवेल – रायगडच्या वतीने सन्मान
खारघर आरोग्य केंद्रात कोरोनाच्या रुग्णांना दिवस – रात्र सेवा देणाऱ्या डॉक्टर, शिक्षक, नर्स यांचा राजे प्रतिष्ठान पनवेल – रायगडच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी रणरागिणी ज्योस्तना भरडा, शिक्षक वैभव पाटील, डॉ. पंकज तितर, डॉ. संदीप सिंग, डॉ. स्नेहा नबियार, डॉ. कल्पेश खैरनार, श्रीमती सरिता काकडे, श्रीमती आश्विनी भोईर, रुपेश मोर्बेकर यांना कोविड योद्धा सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी राजे प्रतिष्ठानचे रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक, नवीन पनवेल अध्यक्ष संतोष आमले, अमित पंडित, ओमकार पंडित आदी उपस्थित होते.