- भाजयुमो पश्चिम महाराष्ट्र दौर्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल, दि.16 (वार्ताहर) ः पश्चिम महाराष्ट्र दौरा दरम्यान भाजयुमो पश्चिम महाराष्ट्र विभागाची विशेष बैठक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी आयोजित केली होती. या मध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांची विशेष उपस्थिती लाभली.
या प्रसंगी पश्चिम महाराष्ट्र विभाग भाजयुमो ची आगामी वाटचाल याविषयी चर्चा करण्यात आली. सेवा सप्ताह कार्यक्रम, आत्मनिर्भर भारत अभियान या विषयावर नियोजन करण्यात आले. या बैठकीला भाजपा पुणे शहर जिल्हा सरचिटणीस राजेश पांडे, भाजयुमो प्रदेश सरचिटणीस सुशिल मेंगडे, भाजपा पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री रवी अनासपुरे, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र साबळे, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष सुदर्शन पाटसकर, प्रदेश सचिव प्रवीण पोंडे, सचिव प्रदीप गावडे, युवती विभाग सह संयोजिका वैशाली खाडे व इतर मान्यवर उपस्थित होते.
फोटो ः भाजयुमो पश्चिम महाराष्ट्र दौर्याच्या वेळी करण्यात आला विशेष सत्कार.