छात्रभारती विद्यार्थी संघटना नवी मुंबईच्या वतीने ऑक्सिमित्र नावाची मोहीम
पनवेल / वार्ताहर : छात्रभारती विद्यार्थी संघटना नवी मुंबई कोरोना काळात ऑनलाइन शिक्षणाला विरोध करत विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर काम करत आहे तसेच सामाजिक बांधिलकी जपत रोरगरीब जनतेला सेवाही पुरवत आहे. कोविड १९ चा प्रादुर्भाव लक्षात घेता ह्या आजाराने जगभरासह संपूर्ण देशात थैमान घातल आहे. पनवेल विभागात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षणीय आहे ह्या आजाराची भीती घालवण्यासाठी लोकांमध्ये आरोग्य विषयक जनजागृती निर्माण करण्यासाठी छात्रभारती विद्यार्थी संघटना नवी मुंबई ऑक्सिमित्र नावाची मोहीम राबवत आहे या मोहीमे अंतर्गत लोकांच्या शरीराचे तापमान, पल्स काउंट, ऑक्सिजनची मात्रता तपासून त्यांना त्याची माहिती दिली जाते. आपण स्वताची योग्य ती काळजी घेतली, सुरक्षित अंतर ठेवल, आपल शरीर निरोगी तंदुरुस्त असेल तर कोरोना सारखे हजार आजार जन्माला आले तरी ह्या आजाराला घाबरायची गरज नाही हा संदेश देण्याचा प्रयत्न नवी मुंबई छात्रभारतीने ऑक्सिमित्र मोहीम राबवून दिला. तसेच कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या जाणून त्या सोडवण्यासाठी गूगल फॉर्म भरुन घेण्यात आले. छात्रभारती विद्यार्थी संघटना नवी मुंबई एकाच वेळी शिक्षण व आरोग्य क्षेत्रात यशस्वीपणे काम करत आहे. यावेळी अध्यक्ष : अजय कांबळे, सिद्धांत कडलक, अक्षय भोसले, समिक्षा जाधव, स्नेहा हाटे, जतीन पाटील, प्रथमेश ईलकर, सुमीत आठवले, प्रनय भोसले, राजू गुंजाळ, प्रविण विटकर, सिद्धांत सिरसाट, आदित्य हिरे ईत्यादी छात्रभारतीचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. ह कार्यक्रम युगांतक काँलनी जरीमरी मंदीर सुकापुर येथे झाला