मोबाईल व घरफोडी चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना २४ तासात अटक
पनवेल/२४ सप्टेंबर,संजय कदम :- मोबाईल व घर फोडी चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना २४ तासात अटक दिनांक १६ / ० ९ / २०२० रोजी , दोन अनोळखी इसमांनी रबाळे MIDC रोडवर त्यांच्याकडील मोटार सायकल नं MH 04 GY 5213 फिर्यादी यांचे समोर आडवी लावुन त्यांना स्कु ड्राव्हरचा धाक दाखवुन जबरदस्तीने त्यांचेकडील एक व्हिवो कंपनीचा मोबाईल व रोख रक्कम असा ११,००० रु . चा माल जबरीने चोरी करुन पळुन गेलेबाबत गु.र.न. । २०४/२०२० , भादवि कलम ३ ९ २ , ३४१ , ३४ प्रमाणे दि . १७ / ० ९ / २०२० रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सदर घटना घडल्यानंतर आरोपीतांनी गुन्हयात वापरलेली मो . सायकलचा क्रमांक प्राप्त असल्याने त्या आधारे रबाळे MIDC पोलीसांनी आरोपींचा सर्वतोपरीने तपास करुन आरोपी निष्पन्न करुन त्यांना दिनांक १७ / ० ९ / २०२० रोजी अटक केली आहे . अटक आरोपी : नावे १ ) तबरेज आलम अब्बु बाकर शेख वय १८ वर्षे , २ ) अब्बास मोहम्मद शरीफ शेख वय २० वर्षे , ३ ) मोहम्मद तौफीक अब्दुल करीम अन्सारी वय २० वर्षे , हस्तगत मालमत्ता १ ) व्हिवो कंपनीचा मोबाईल व रोख रक्कम ( गुन्हयातील ) २ ) एकुण ९ मोबाईल इतर गुन्हयातील रेडमी , सॅमसंग , विवो , रिअलमी कंपनीचे ३ ) एक मोटर सायकल नं . MH 04 GY 5213 गुन्हयात वापरलेली ४ ) स्कु ड्रायव्हर , एकुण हस्तगत मालमत्ता किंमत रु . १,०१,००० / तसेच दि .०४.० ९ .२०२० रोजी रात्रौ टॉरशन इंन्डस्ट्रीज प्लॉट नं.आर ३०३ , या कंपनीत कोणतरी अज्ञात इसमाने प्रवेश करून , कंपनीतील २,६३,२३५ / – एकूण किंमतीचा कॉपर कॉईलचे बंडल घरफोडी चोरी करून नेलेबाबत फिर्यादी यांनी दिले तक्रारीवरुन गु.र.न. १ ९ ४ / २०२० भा.द.वि.कलम ४५४ , ४५७ , ३८० प्रमाणे दिनांक ०५ / ० ९ / २०२० रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी बातमीदारांचे मदतीने आरोपीची माहिती प्राप्त करुन गुन्हयात आरोपींना दिनांक ०५ / ० ९ / २०२० रोजी अटक करण्यात आली आहे . अटक आरोपी नावे : १ ) भाऊसाहेब सिताराम मगडे वय ३४ २ ) गोपाल दिनानाथ पटवा वय २५ ३ ) इंदल धनराज बिंद वय ३५ हस्तगत मालमत्ता १ ) कॉपर कॉईलचे १४ बंडल एकुण हस्तगत मालमत्ता किंमत रु , २,६३,२३५ / सदरची कामगिरी मा . श्री . बिपीन कुमार सिंह , पोलीस आयुक्त , मा . डॉ . जय जाधव , पोलीस सह आयुक्त , मा . श्री . पंकज डहाणे , पोलीस उप आयुक्त , परि . १ वाशी , मा . श्री . विनायक वस्त , सहा . पोलीस आयुक्त , वाशी विभाग , यांचे मार्गदर्शनाखाली तसेच श्री . नितीन गिते , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , श्री . अनिल पाटील , पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) यांचे अधिपत्याखाली सदर गुन्हा उघडकीस आणणेकामी श्री . सागर गवसणे सपोनि , श्री . किरण पाटील , श्री . शिवराज सोनवणे , पोउपनि , पोहवा / १५ ९ अनिल यादव , पोहवा / १२०६ गडदे , पोना / १ ९ ७३ जाधव , पोना / २१४० पोळ , पोना / ८१ ९ पाटील , पोना / २२ ९९ वाघमोडे , पोशि / १२३२७ सोनवणे , होमगार्ड खान यांनी उत्कृष्ठ कामगिरी केलेली आहे . सदर गुन्हयांचा अधिक तपास चालु आहे .