शेतकऱ्यांच देशभर विधेयका विरोधी आंदोलन, छात्रभारती विद्यार्थी संघटना नवी मुंबई यांचा जाहीर पाठिबा.
नवी मुबई / वार्ताहर : शेतकरी आणि शेती व्यवस्था उद्ध्वस्त करणारी तीन विधेयकं केंद्र सरकारने नुकतीच दडपशाहीने मंजूर करून घेतली आहेत. या विधेयकांच्या विरोधात आज वाशी नवी मुंबई येथील APMC बाजार समितीचे मुख्य सचिव यांना विधेयकाविरोधात छात्रभारती नवी मुंबईतर्फे निवेदन देण्यात आले त्यानंतर बाजार समिती समोर निदर्शने करून निषेध व्यक्त करण्यात आला तद्प्रसंगी छात्रभरती नवी मुंबईचे अध्यक्ष-अजय कांबळे, प्रणय साळवी, अक्षय भोसले, सिद्धांत कडलक, कृणाल जमादार, रेखा इंगरुळकर, हार्दिक जुवेकर, गौतम गाडे ईत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
छात्रभारती विद्यार्थी संघटना नवी मुंबई केंद्र सरकारच्या या विधेयकांचा विरोध करते तसेच शेतकऱ्यांनी देशभरात या विधेयका विरोधात मोठे आंदोलन सुरू केले आहे त्या आंदोलनाला छात्रभारतीचा संपूर्ण पाठिंबा देते व आंदोलनाच समर्थन करतो.