मा.उपमहापौर व भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. विक्रांतदादा पाटील यांच्या प्रभाग क्र.१८ मध्ये माझे कुटुंब-माझी जबाबदारी या महानगरपालिकने सुरु केलेल्या मोहिमेला सुरुवात झाली.
पनवेल / वार्ताहर : माझे प्रभाग-माझी जबाबदारी या अनुषंगाने काम करणारे श्री. विक्रांतदादा पाटील यांनी आपल्या प्रभाग क्र.१८ मध्ये आरोग्य तपासणी मोहिमेला सुरुवात केली. आज भुसार मोहल्ला येथे स्वतः जातीने उपस्थित राहून या मोहिमेत सहभाग घेतला. या आरोग्य तपासणी मध्ये घरोघरी जाऊन कुटुंबाची माहिती, पल्स, आँक्सीजन लेवल व थर्मल स्कॅनिंग केले जाते व जे संभावित रुग्ण आहेत त्यांची यादी तयार करुण महानगरपालिकेच्या वैद्यकिय विभागाकड़े सुपूर्त करण्यात येते. यामुळे कोविड-१९ हा आजार पसरण्यास आळा बसणार आहे. प्रभागातील कामासाठी नेहमी तत्पर असणारे मा.उपमहापौर श्री. विक्रांतदादा पाटील यांच्या कामाबद्दल जनतेकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी डॉ. अंजली सावंत व त्यांची टीम आणि इतर मान्यवर उपस्थित होते.