रेल्वेच्या पादचारी पूलाजवळ आढळला मृतदेह पनवेल
दि.28 (वार्ताहर)- नवीन पनवेल ब्रीजखाली रेल्वेच्या पादचारी पूलाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला पायऱ्यांसमोर एका इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलिस करीत आहेत.
सुभाष राजभर वय अंदाजे 50 ते 55 वर्षे असून अंगात निळ्या रंगाचा पांढरे ठिपके असलेला कॉटनचा फूल बाह्यांचा शर्ट व काळ्या रंगाची हाफपॅंट घातलेली आहे. पायात पिवळ्या काळ्या रंगाची चप्पल आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलिस ठाणे दुरध्वनी-02227452333 किंवा पो.हवा. रघुनाथ साबळे यांच्याशी संपर्क साधावा.