पनवेल मध्ये महागड्या सायकलची चोरी
पनवेल, दि.3 (वार्ताहर) êइमारतीच्या खालील जिन्याजवळ उभी करून तसेच तिला साखळीने बांधून ठेवलेली महागडी सायकल अज्ञात— चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना पनवेल शहरात घडली आहे.
शहरातील मिडलक्लास हौ.सोसायटीत असलेल्या साई हर्ष सोसायटीच्या पार्कींगमध्ये सचिन ठाकरे यांनी व्यायामासाठी फ्रॉग वायफर कंपनीची महागडी सायकल विकत घेतली होती. सदर सायकल ही त्या इमारतीच्या जिन्याजवळ उभी ठेवून तिला साखळीने बांधून ठेवले होते. परंतु अज्ञात चोरट्यांनी सदर सायकल चोरुन नेली आहे. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.