कल्याणमध्ये मोटरसायकल व मोबाइल चोराच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या
कल्याण/वार्ताहर : कल्याण डोंबिवली परिसरात अनेक गुन्हे दाखल असलेल्या अट्टल मोबाईल व मोटरसायकल चोराला खडकपाडा पोलिसांनी अटक केली आहे.
खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रं.३१४/२०२० भादवी कलम ३९२,३४ प्रमाणे दाखल करण्यात आल्यानंतर तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोपीचा शिताफीने शोध घेऊन पडघा,भिवंडी येथून मुसक्या आवळल्या.
धनंजय निवृत्ती पाटील याला अटक केल्यानंतर त्याच्या इतर साथीदाराचा शोध सुरू आहे.आरोपीकडून १२ मोबाईल व एक केटीएम २०० ही मोटरसायकल हस्तगत करण्यात आली आहे.
सदर आरोपीवर खडकपाडा पोलीस ठाण्यात ५ तर कोळसेवाडी,रामनगर व विष्णुनगर पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे
सदरची कौतुकास्पद कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग,पोलीस उपायुक्त, परिमंडळ-३ यांच्या मार्गदर्शनाखाली खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पवार,तपास अधिकारी सहा. पो.नि.प्रीतम चौधरी व त्यांच्या इतर सहकाऱ्यानी केली आहे.