सिडको प्रकल्पग्रस्तांसाठी मंत्रालय पातळीवर उच्च स्तरीय बैठक बोलावण्याची शिवसेनेची मागणी- जिल्हाप्रमुख शिरीष घरत
पनवेल, दि.9 (वार्ताहर) ः सिडकोने संपादित केलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या जमीनीवर सिडकोने नवी मुंबईची नीर्मीती करून लाखो कोटी रुपये कमवले आहेत.
परंतु ह्याच सिडकोने प्रकल्पग्रस्तांच्या ज्वलंत प्रश्नावर त्यांच्या न्याय मागण्यावर आजपर्यंत टाळाटाळ केली. त्यातील काही महत्वाच्या मागण्या जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या पुढाकाराने ज्येष्ठ शिवसैनिक विष्णु गवळी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव संजीव कुमार, उद्योग मंत्री सुभाष देसाई व प्रधान सचीव नगर विकास यांना सादर करून प्रकल्प ग्रस्तांच्या मागण्या सोडवण्यासाठी मंत्रालय पातळीवर उच्चस्तरीय बैठक बोलावण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व इतरांना दिलेल्या निवेदनात प्रकल्पग्रस्तांचे खालील प्रमुख मागण्या नमुद करण्यात आल्या आहेत. सिडकोने नवी मुंबई प्रकल्पाकरिता जमिनी संपादित करण्यापुर्वी खारघर, कामोठे, उलवे, करंजाडे ,नवीन पनवेल, कलंबोली इतर सर्व प्रकल्पग्रस्त गावांमध्ये करण्यात आलेली 2016 पूर्वीची जमीन संपादनापुर्वीची सर्व बांधकामे गरजेपोटी बांधलेली सर्व निवासस्थाने व इमारती,मंदिरे प्रार्थना स्थळे, महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1966 मधील कलम 52 क नुसार अधिकृत बांधकाम प्रशमान अल्प आकार लावून प्रशमीत संरचना म्हणून घोषीत करण्यासाठी अधिनियमांचे कलम 158(1) अन्वये नियम प्रसिद्ध करून अधिकृत करणे व याबाबत अर्ज करण्याची मुदत 1मे 2018 पर्यंत वाढवणे. बेलपाडा, कलंबोली, रोडपाली, जुई कामोठे व इतर महापालिकेत समाविष्ट गावांतील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण, सर्व नादुरुस्त रस्त्यांचे नव्याने पुरनिर्माण करणे, नवीन सिवरेज लाईन बांधून सिवरेज व ड्रेनेज लाईनेचे अत्याधुनिक करणे, त्याच प्रमाणे पनवेल महानगर पालिकेस हस्थांस्तरीत करण्यात येणार्या सर्व गावांमधील अंतर्गत रस्त्यांची दुरूस्ती करणे, कोंक्रिटीकरण करणे, व नवीन ड्रेनेज लाईन टाकून ड्रेनेज लाइनचे पुनर्निर्माण करणे कळंबोली नोड सेक्टर 3 मधील श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाचे स्टेडीयममध्ये रूपांतर करणे. दिलेल्या प्रस्ताव संदर्भात तत्काल निर्णय घेऊन श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाचे स्टेडीयममध्ये रूपांतर करून अत्याधुनिक करणे, कलंबोली प्रमाणेच कामोठे ,खांदा कॉलनी ,नवीन पनवेल(पूर्व) व (पश्चिम) खारघर, तलोजा व इतर सेव हस्थानस्तरीत करण्यात येणार्या गावांमध्ये क्रीडांगण तयार करणे व त्या करिता जागा उपलब्ध करून देवून योग्य नियोजन करणे. कळंबोली गाव सेक्टर 1,1ई येथे सार्वजनिक उद्यानाचे नियोजन करून उद्यान निर्माण करून सुशोभीकरण करणे, लहान मुलांची खेळणी बसविणे, त्याच प्रमाणे महानगरपालिकेस हस्थानस्थरीत करण्यात येणार्या प्रत्येक गावात उद्यान निर्मिती करणे, नाना-नानी पार्क बनवणे जीवशास्त्र उद्यान व जेस्ठांसाठी निवारा बनविणे. प्रकल्पग्रस्त गावे व सिडको नोड मध्ये सर्व घाणीचे कचर्याचे साम्राज्य असून दुर्गंधी पसरून डेंगू मलेरिया सारख्या सर्व साथीच्या रोगाणी मागील अनेक वर्षापासून थैमान घातले आहे. सिडको प्रशासनाचे आज पर्यन्त कलंबोली नोड व महापालिकेत समाविस्ठ गावामध्ये पुर्णपणे दुर्लक्ष केले आहे. कळंबोली गाव, सिडको कळंबोली नोड व सिडको नोड मधील सर्व सेक्टर व महानगर पालिकेत हस्तांतरीत होणार्या सर्व गावांमध्ये दसप्रतिबंद औषधांची व धुराची आठवड्यातून दोन वेळा फवरनी करणे,भारत स्वछता अभियानअंतर्गत राखीव निधीतून पनवेल महापालिका व सिडको यांच्या संयुक्त विध्यमाने महानगर पालिकेच्या सर्व क्षेत्रात स्वछ्ता अभियान युद्ध पातळीवर राबवणे. सिडको सर्व नोड मध्ये मुख्य रस्त्यांवर कोट्यवधी रूपये खर्च करून सि.सि.टी.व्ही. यंत्रणा बसवली आहे. तशीच यंत्रणा सर्व प्रकल्पग्रस्त सर्व सिडको नोड चे सर्व सेक्टर्स गावे उर्वरित भाग व महानगर पालिकेस हस्तांतरित होणार्या गावांमध्ये विना विलंब बसविण्यात यावी. खारघर, कामोठे,उलवे,करंजाडे, नवीन पनवेल,कलंबोली,तलोजा नोड माधील सिडकोच्या सर्व नोड मधील व महानगर पालिकेस हस्तांतरित होणार्या गावांमधील वाललेल्या संभाव्य.धोकदायक झाडांची छाटणी करणे, वाळलेली झाडे तोडणे,पावसाळ्यात जून महिन्यात महानगर पालिका क्षेत्र व सिडको नोड मध्ये वृक्षारोपण मोहीम राबवून पर्यावरनाचे संतुलन राखणे. सिडको नवी मुंबईच्या निर्मिती करिता 47 वर्षापूर्वी राज्यासरकारने पनवेल-रायगड व नवी मुंबईतील शेतकर्यांची जमीन संपादित केली आहे. सिडको ही नवी मुंबईची नियोजनकार असणारी राज्य सरकारची प्रा.लि. कंपनी आहे.महापालिकेला हस्तांतरनापूर्वी सर्व मूलभूत सेवा पुरवणे सिडकोस बंधनकारक आहे. कळंबोली, खारघर व इतर गावातील वंचित घटक असलेल्या कातकरवाडी आदिवासी पाडा या ठिकाणी नियोजन करून आदिवासींकरिता वीर बिरसा मुंडा समाज मंदिर बांधणे. बेलपाडागाव व सर्व सिडको नोड मधील शहारासाठी समाज मंदिर (कम्युनिटी हॉल )साठी जागेचे नियोजन करून जागा उपलब्ध करून देणे व समाजमंदिर कम्युनिटी हॉल ची निर्मिती करणे, त्याचप्रमाणे सिडकोच्या प्रत्येक नोड मध्ये व महानगर पालिकेस हस्तांतरित होणार्या गावांमध्ये समाजमंदिर व कम्युनिटी सेंटर उपलब्ध करून देणे. सर्व जाती धर्मामध्ये समतोल राहावा या करिता बौद्ध समाज राहत असलेल्या गावातील बौद्धवाडी येथे व सर्व नोडमध्ये व महापालिकेतील हस्तांतरित होणार्या सर्व गावांमध्ये बौद्धवाडी, बुद्ध विहार/ समाज मंदिर व कम्युनिटी सेंटर उपलब्ध करून देणे. कळंबोली नोड मधील जाधववडी बेलदारवाडी येथे समाज मंदिर बांधणे. सिडको,करंजाडे, उलवे, च्या खारघर कलंबोली नोड मध्ये व कामोठे नोड, खांदा कॉलनी, नवीन पनवेल (पूर्व) व (पश्चिम) या भागात अधिनियम पाणी पुरवठा होत असतो. आठवड्यातुन अनेकदा पाणी पुरवठा सबल कारनाअभावी खंडित करण्यात येतो.पाणी पुरवठा करणार्या पंपिंग स्टेशनला जनरेटर बसवून नियमित पणे पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा. यापूर्वी मी सादर केलेल्या व मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित असलेल्या पाणी प्रश्नाच्या प्रस्तावांच्या अनुषंगाने पनवेल महानगर पालिका क्षेत्राची शहराची वाढती लोकसंख्या व त्या अनुषंगाने वाढलेल्या पाण्याची गरज पाहता प्रत्येक नोडमध्ये 10 दशलक्ष लीटर पाण्याची टाकी बांधणे. कळंबोली गावातील एकमेव भव्य अशा तलवास कठडा बांधून गाळ काढणे परिसरात जॉगिंग ट्रक तयार करून पेव्हर ब्लॉक बसविणे, सोलार ट्री, सोला दिवे बसविणे व खान्देश्वर नवीन पनवेल (प) येथील तलावाचे शुशोभीकरण करणे. 15) बेलपाडा, खारघर, तलोजा, कलंबोली गाव, कलंबोली नोड व सिडकोतर्फे महानगर पालिकेस हस्तांतरण करण्यात येणार्या प्रत्येक गावांमध्ये पत्येक वाँर्डात सार्वजनिक शौचालय व नवी मुंबईच्या धर्तीवर ई टोयलेट बांधणे या करिता मी दी.08/10/2020 रोजी मा.नगरविकास मंत्री यांना व सिडकोस प्रस्ताव सादर केला आहे. प्रकल्पग्रस्त गावंसह महानगर पालिकेत समविष्ठ केलेल्या व हस्थांस्तरीत होणार्या प्रत्येक गावातसार्वजनिक विधयुत पोल लावून पद पथावर व गावातील अंतर्गत रस्त्यांवर विधयुत पुरवठा करणे. याबाबत दी.07/10/2020 रोजी प्रस्ताव मा. नगर विकास मंत्री व सिडकोस केला आहे. सिडको सर्व नोड, महापालिकेत समाविष्ठ सर्व गावे, महानगर पालिकेस हस्थांस्तरीत करण्यात येणार्या प्रत्येक गावांमध्ये व सर्व सिडको नोडमध्ये लोकसंख्येनुसार होकर्सझोन तयार करून फेरीवाल्यांचे भाजी व फळ विक्रेत्यांचे व मासळी विक्रेत्यांचे पुनर्वसन करणे, युद्धपातळीवर सर्वे करून होकर्स झोन तयार करणे. पनवेल महानगरपालिकेत समाविष्ठ करण्यात आलेल्या हस्तांतरित न झालेल्या सर्व गावांमधील जिल्हा परिषदेच्या शाळा, बाळ्वाड्यांची जीर्ण अवस्था झाली आहे.अत्यंत वाईट अवस्थेत असलेल्या शाळांची डागडुजी/दुरूस्ती करणे सर्व शाळांना भारत स्वछता अभियाना अंतर्गत रंगरंगोटी करून अत्यावश्यक सेवा सुविधा विना विलंब पुरविणे. सिडकोने किंवा अन्य प्राधिकरनाणे, नवी मुंबईच्या निर्मितीसाठी एम.आय.डी.सी. च्या निर्मिती साठी संपादित सर्व गावंसह राज्याच्या इतर भागातील पुनरवसनासाठी जमीन संपादित केलेल्या महानगर पालिका क्षेत्रात समाविष्ठ करण्यात आलेल्या गावांमध्ये गावठाण विस्तार करणे, सिमा रेषा निश्चित करून प्रत्येक गावांमध्ये संरक्षण भिंत बांधणे. पनवेल महापालिका समाविष्ठ करण्यात आलेल्या सर्व गावातील ग्रामपंचायतीच्या कर्मचार्यांना महानगर्पालिकेत समाविष्ठ करून घेणे व त्यांच्या सेवा जेस्ठता कार्यकाळ ग्रामपंचायत जिल्हा परिषदेच्या सेवेत रुजू झाल्यापासून ग्राह्य धरणे. सर्व ग्रामपंचायतीतून महानगर पालिकेत रुजू झालेल्या कर्मचार्यांचे वेतन विना विलंब वेळेवर देणे. सिडकोने अल्पदरात भूखंड उपलब्ध करून दिलेल्या सिडको नोड मधील सर्व शाळा महाविध्यालयांमधे स्थानिक प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांच्या मुलांना व इतर सर्व समाजातील विध्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार शिक्षण हक्क कायदयाअंतर्गत डोनेशन न घेता अल्पदरात के. जी, सीनियर के. जी. शाळा महाविध्यालयात प्रवेश मिलवून देणेबाबत महानगरपालिका सिडको व सर्व चालक व लोकप्रतीनिधींची समन्वय समिति स्थापन करून कायम स्वरूपी उपाय योजना करणे. सर्व संपादित गावांमध्ये ठराविक अंतरावर पोलिस आऊट पोस्ट बांधून व कायदा सुव्यवस्था राखणे व 4 वर्षापूर्वी नव्याने स्थापन झालेल्या पनवेल महानगरपालिका व राज्य सरकारकडे मागील 47 वर्षापासून प्रलंबित आहेत. अनेकवेळा मागील अनेक वर्षापासून अर्ज विनंत्या करून, निवेदन देवून सिडकोने व राज्य सरकारने आमच्यासह सर्वच प्रकल्पग्रस्थांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. याची गंभीर नोंद घेण्यात आली आहे. सिडको प्रकल्पग्रस्त विध्यार्थ्यांचे मागील 4 वर्षात थांबवलेली विध्यावेतन सिडको मार्फत पुनश: सुरू करणे.
आपण स्वत: सादर प्रकरणी व्यवस्थापकीय संचालक सिडको, सह व्यवस्थापकीय संचालक सिडको, सिडकोच्या सर्व संबधित विभाग प्रमुख, महानगरपालिका आयुक्त पनवेल महानगरपालिका, सर्व संबधित विभाग प्रमुख,महानगरपालिका आयुक्त पनवेल महानगरपालिका आयुक्त नवी मुंबई,मुख्यधारीकरी उरण नगरपरिषद,सर्व संबंधित अधिकारी,जिल्हाधिकारी रायगड,उपजिल्हाधिकारी पनवेल विभाग,जिल्हा पुनर्वसन अधिकारी रायगड,तहसिलदार पनवेल,पोलिस आयुक्त नवी मुंबई,पोलिस अधीक्षक रायगड,पोलिस उपायुक्त परिमंडळ 2 पनवेल, पनवेल सहायक आयुक्त पनवेल विभाग व सर्व लोक प्रतीनिधी यांची सयुक्त उच्च स्तरीय बैठक बोलावून सिडको नोड मधून पनवेल महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आलेली सर्व गावे, सर्व सिडको नोड मधील माझ्या निवेदनात समाविष्ट करण्यात आलेल्या स्वयंस्पस्ठ विविध प्रश्नांवर व जनहितच्या नागरी समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढून सर्व महत्वाचे जनहितांचे प्रश्न सोडविण्याबाबत सर्व संबधितांची उच्चस्तरीय बैठक बोलावून योग्य ती सकारात्मक कारवाई व उपाय योजना तातडीने करण्याचे आदेश निर्देश द्यावेत. अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात