वाशी पोलिस ठाणे येथील अधिकारी व अंमलदार तसेच काही समाजसेवक यांनी पो.ह. चालक खोत यांचे कुटुंबीयांना 6,00,000/- रुपयेची केली आर्थिक मदत
पनवेल / वार्ताहर: वाशी पोलीस ठाणे येथील दिवंगत पो.ह. चालक ८७४/ राजेंद्र बाळासाहेब खोत हे कर्तव्य बजावीत असतांना त्यांना दिनांक १६.९.२०२० रोजी कोरोना संसर्गाची लागण झाली. त्यांच्यावर डी.वाय. पाटील हॉस्पिटल, नेरूळ येथे उपचार सुरू असताना डॉक्टरांनी त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. परंतु दि. २७.९.२०२० रोजी त्यांचे निधन झाले. पोलीस हवालदार खोत हे अतिशय कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक व मनमिळावू व्यक्तिमत्व असलेले अंमलदार होते. त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे अशा स्थितीत संपूर्ण नवी मुंबई पोलीस दल त्यांचे कुटुंब यांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहे. वाशी पोलिस ठाणे येथील अधिकारी व अंमलदार तसेच काही समाजसेवक यांनी पो.ह. चालक खोत यांचे कुटुंबीयांना आर्थिक मदत म्हणून 6,00,000/- रुपये एवढी मोठी रक्कम जमा केली. सदरची आर्थिक मदत
मा. पोलीस उपायुक्त, परिमंडळ १, वाशी यांच्या हस्ते व मा. सपोआ, वाशी विभाग यांच्या उपस्थितीत अदा करण्यात आली.