सामान्य नागरिक साप्ताहिकाचे दिवाळी अंकाचे आमदार प्रशांत दादा ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले प्रकाशन
पनवेल दि.15 (वार्ताहर)- सामान्य नागरिक साप्ताहिकाचे दिवाळी अंकाचे प्रकाशन आमदार प्रशांत दादा ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आ. प्रशांत ठाकूर यांनी सामान्य नागरिक साप्ताहिकाचे कौतुक केले. याप्रसंगी मुख्य संपादक शाबीर शेख, भाजपा रायगड सरचिटणीस अविनाश कोळी, ज्येष्ठ वकील राजेंद्र येरुणकर, ज्येष्ठ पत्रकार संजय कदम, असीम शेख, वीक्की होँक्लस हे उपस्थित होते.