राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे लोकनेते रामशेठ ठाकूर यांना ” पनवेलकरांचा अभिमान ” पुरस्काराने सन्मानित.
पनवेल / प्रतिनिधी : कोरोना या वैश्विक महामारीच्या काळात नागरिकांना तन-मन-धनाने मदत करणारे रायगडचे माजी खासदार, दानशूर व्यक्तिमत्व लोकनेते रामशेठ ठाकूर गेली अनेक वर्षे जनतेच्या लहानमोठ्या प्रश्नांकडे बारकाईने आणि जातीने लक्ष देणारे व सतत माणसांमध्ये रमणारे लोकनेते रामशेठ ठाकूर कोरोनाच्या अभूतपूर्व संकटकाळातही जनसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. लॉकडाऊन पुकारण्यात आल्यानंतर हातावर पोट असलेल्या अनेकांची उपजीविका अडचणीत आली. माणूस केवळ दौलतीने मेाठा होत नाही तर तो दानतीने आणि माणुसकीने मोठा होतो. याचे जिवंत उदाहरण म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे पहिले जाते. निरागस, निस्वार्थी जीवन जगणे, लोकांना मदत करणे, काय मिळाले आणि काय दिले याचा विचार देखील न करणारे निस्वार्थी नेतृत्व म्हणजे रामशेठ ठाकूर होय. त्यांच्या नावाला सार्थ ठरणारे जीवन त्यांनी घडविले ही किमयाच म्हणावी लागेल. त्यांच्या नावाप्रमाणे राम आणि शेठ, संयम, दानशूर, मर्यादा रामासारख्या तर उपकारी, निस्वार्थीपणा, दायित्व शेठ सारखे आहे. थोडक्यात लोकनेते रामशेठ ठाकूर एक अष्टपैलू असलेले नेतृत्व रायगड जिल्ह्याला लाभले. कष्ट करून एवढे बलाढ्य साम्राज्य उभे करणे आणि लोकांना भरभरून देण्याची दानत लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे आहे. ‘मरावे परि किर्तीरूपी उरावे’ या बोधक म्हणीला सार्थ आज सर्वंकाही लोकनेते रामशेठ यांच्या पायाशी लोळण घालत आहे. ९० टक्के समाजकारण आणि १० टक्के राजकारण असे असले तरी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गरजूंच्या मदतीसाठी कधीही राजकारण केले नाही, सदैव आपल्याकडून कशी मदत होईल याचाच त्यांनी विचार केला. त्यामुळे लोकांवर आलेले कोणतेही संकट असो ते आपले आहे असे मानून लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सढळ हाताने समाजाचे देणेदार लागतो या भावनेतून काम केले. त्यामुळे गोरगरिबांच्या हाकेला धावून जाणारे दानशूर व्यक्तिमत्त्व ही त्यांची जनमानसावर प्रतिमा कोरली गेली. गेली अनेक वर्षे जनतेच्या लहानमोठ्या प्रश्नांकडे बारकाईने आणि जातीने लक्ष देणारे व सतत माणसांमध्ये रमणारे लोकनेते रामशेठ ठाकूर कोरोनाच्या अभूतपूर्व संकटकाळातही जनसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. लॉकडाऊन पुकारण्यात आल्यानंतर हातावर पोट असलेल्या अनेकांची उपजीविका अडचणीत आली. माणूस केवळ दौलतीने मेाठा होत नाही तर तो दानतीने आणि माणुसकीने मोठा होतो. याचे जिवंत उदाहरण म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे पहिले जाते. कोरोना महामारी मध्ये आपल्या दानतीचे व माणुसकीचे दर्शन देताना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी लाखो जणांना मदतीचा हात दिला. त्यांनी स्वखर्चातून दिड लाखाहून अधिक अन्नधान्याचे किट, कम्युनिटी किचनच्या माध्यमातून अन्नछत्र, गावाला जाण्यासाठी मदत, रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी रक्तदान शिबिरांचे आयोजन, स्वछता मोहिम, आर्थिक मदत, याखेरीज अर्सेनिक अल्बम गोळ्या, सॅनिटायझर, मास्कचे वाटप, गणपती सण गोड करण्यासाठी ६० हजार जणांना प्रसादासाठी अन्नधान्य, अशी हरएक आवश्यक मदत लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या माध्यमातून नागरिकांना झाली. महापूर असो किंवा कोणतीही आपत्कालीन परिस्थिती गोरगरिबांना मदत करणारे, विविध सामाजिक उपक्रम राबविणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या रूपाने समाजाला कल्पवृक्ष मिळाला आहे त्यांचे कार्य समाजाला आदर्श आहे, त्यामुळेच त्यांना समाजात मान सन्मान आणि त्यांच्या शब्दाला किंमत आहे. त्यांनी कोरोना काळामध्ये लॉकडाऊन सारख्या परिस्थितीत समाजातील सर्व घटकांना एक कुटुंब मानून काळजी घेतली व मदतही केली त्याबद्दल श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेमार्फत लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा ” पनवेलकरांचा अभिमान ” हा पुरस्कार देऊन सन्मान केला. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या निवासस्थानी हा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी पनवेलमधील जेष्ठ पत्रकार व कोकण संध्या वृत्तपत्राचे संपादक दीपक महाडिक यांचा वाढदिवसाचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दीपक महाडिक यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक, तालुका उपाध्यक्ष विजय दुन्द्रेकर, नवीन पनवेल अध्यक्ष संतोष आमले, उपाध्यक्ष सुरेश भोईर, खांदा कॉलनी अध्यक्ष मछिंद्र पाटील, जेष्ठ पत्रकार दीपक महाडिक, अरविंद पोतदार, पत्रकार संजय कदम, निलेश सोनावणे, अनिल भोळे, मयूर तांबडे, रवींद्र गायकवाड, ऍड. मनोहर सचदेव, ओमकार महाडिक, कैलास रक्ताटे, अनिल दुन्द्रेकर, आनंद सुरते, उद्योजक रमण खुटलें, आदेश पोतदार यांच्यासह राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.