घाणीचा कचरा टाकून पळून जाणाऱ्या ट्रक चालकास खारघर पोलिसांनी केली अटक
पनवेल, दि.30 (वार्ताहर)- बाहेरून कचरा, घाण ट्रकमध्ये भरून आणून खारघर परिसरात टाकून पसार होणाऱ्या ट्रक चालकासखारघर पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. खारघर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बाहेरून कचरा आणून तो टाकून पसार होण्याचे प्रकार घडत होते. याबाबत स्थानिक नागरिकांनी खारघर पोलिस ठाण्याचे वपोनि शत्रृघ्न माळी यांच्याकडे तक्रार करताच त्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास सापळा लावून कचरा टाकून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या ट्रक चालकास अटक करून पनवेल महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलवून 10 हजारांची दंडात्मक कारवाई कऱण्यात आली आहे.कोट-अशा प्रकारे कोणी कचरा टाकून पळून जात असेल तर त्याचा फोटो खारघर पोलिस ठाण्याचे वपोनि शत्रृघ्न माळी भ्रमणध्वनी- 9892771772 अथवा पोलिस स्टेशन 02222742500 येथे कळवावे.- वपोनि शत्रृघ्न माळी